घरमनोरंजनमराठी टेलिव्हिजनवर १३ वर्षांनी मानसी करणार कमबॅक

मराठी टेलिव्हिजनवर १३ वर्षांनी मानसी करणार कमबॅक

Subscribe

मानसी प्रेक्षकांना एका प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफीसरची भूमिका साकारताना दिसणार

झी मराठी वाहिनीवर ३१ डिसेंबरपासून ‘काय घडलं त्या रात्री?’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने तब्बल १३ वर्षांनी अभिनेत्री मानसी साळवी मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा कमबॅक करणार आहे. झी मराठीवरील गाजलेल्या ‘असंभव’ या सुप्रसिद्ध मालिकेत मानसीने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पंसंतीस पडली होती. यासह मानसीने सौदामिनी आणि नुपूर मालिकेत देखील अभिनय केला होता.

- Advertisement -

‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेत मानसी प्रेक्षकांना एका प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफीसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्ये मागील कोडं सोडवण्यासाठी तिची नेमणूक केली जाते. ही हूशार व चलाख पोलिस ऑफीसर तिच्या पद्धतीने प्रत्येकासमोर निडरपणे उभी राहते, राजकारण वा कुणासमोरही न झुकता वर्दीशी एकनिष्ठ राहून तपास करते.

- Advertisement -

”प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं कि त्याला एक अशी दमदार भूमिका साकारायला मिळावी जी त्याला आपलीशी वाटेल. ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेत आय.पी.एस. ऑफिसर रेवती बोरकरची भूमिका साकारताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. ती एक कणखर अधिकारी आणि एक प्रेमळ आई अशा दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. १३ वर्ष उलटली असली तरी देखील आजही प्रेक्षकांना माझी कारकीर्द लक्षात आहे आणि माझ्या आगामी भूमिकेला देखील तितकाच आपुलकीने प्रोत्साहन देत आहेत यासाठी मी प्रेक्षकांची ऋणी आहे.”, असे मानसीने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना सांगितले.


अलिया भटच्या नव्या फोटोने चाहत्यांना केले क्लिनबोल्ड!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -