घरमनोरंजनहॉलिवूड चित्रपटात पुन्हा दिसणार धनुष

हॉलिवूड चित्रपटात पुन्हा दिसणार धनुष

Subscribe

दाक्षिणात्य अभिनेता धनुष याने हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. यानंतर धनुष आता हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. ‘द ग्रे मॅन’ य़ा हॉलिवूड चित्रपटात धनुषला कास्ट करण्यात आले असून या चित्रपटाचे दिग्दर्शन Avengers Endgame बनवणारा दिग्दर्शक रूसो ब्रदर्स करणार आहे. या चित्रपटात हॉलिवूड स्टार क्रिस इवांस, रायन गॉसलिंग आणि अना दे अर्मस सारखे स्टारही दिसणार आहेत.

- Advertisement -

‘द ग्रे मॅन’ य़ा हॉलिवूड चित्रपटापूर्वी धनुषने ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ या हॉलिवूड चित्रपटात काम केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा धनुष हॉलिवूड चित्रपटात अभिनय करताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘द ग्रे मॅन’ एक स्पाय थ्रीलर चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे आणि याचं बजेट २०० मिलियन डॉलर असल्याचं समजतं. हा चित्रपट मार्क ग्रीनी यांच्या २००९ मध्ये आलेल्या कादंबरीवर तयार केला जात आहे.

या चित्रपटाची कथा एका सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या व्यक्तीवर आधारित आहे. तो कधीकाळी सीआयएसाठी काम करायचा. या खून्याची भूमिका रायन गॉसलिंग साकारेल. क्रिस इवांस सीआयए टीममधील सहकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटींग जानेवारीत लॉस एंजेलिसमध्ये सुरू होणार आहे. मात्र, धनुषच्या भूमिकेबाबत अद्याप काहीही समजू शकले नाही.


मराठी टेलिव्हिजनवर १३ वर्षांनी मानसी करणार कमबॅक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -