घरमनोरंजनहिंसक घटनांदरम्यान Manoj Bajpayee ची 'भगवान और खुदा' कविता होतेय व्हायरल

हिंसक घटनांदरम्यान Manoj Bajpayee ची ‘भगवान और खुदा’ कविता होतेय व्हायरल

Subscribe

भगवान आणि खुदा एकमेकांशी आपापसात बोलत होते. मंदिर आणि मस्जिदलगत असलेल्या रस्त्यात भेटत होते. हात जोडलेले असावे किंवा दुआ करणारे असावे.

सध्या भारतातील काही राज्यांमध्ये धर्मांबाबत वाद-विवाद सुरु आहे. अशावेळी सोशल मीडियावर या घटनांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आता अशातचं बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मनोज वाजपेयीनं देशातल्या एकते बद्दल कविता केली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी व्हायरल झाला हा खास व्हिडिओ

आज म्हणजेच २३ एप्रिल रोजी अभिनेता मनोज बाजपेयीचा वाढदिवस आहे. योगायोग असा की, याचं वेळी त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी जी कविता म्हटली आहे, ती बॉलिवूड दिग्दर्शक मिलाप जावेरी यांनी लिहिलेली आहे. का धर्माच्या नावाखाली होतात वाद ? जर खुदा आणि ईश्वर या विषयावर चर्चा करतील तर ते काय बोलतील, त्यांचा दृष्टिकोण काय असेल. अशा विषयावर ही कविता आहे. खरंतर ही कविता त्या लोकांसाठी आहे. जे धर्माच्या नावाखाली काहीही करण्यासाठी तयार होतात आणि त्यामुळे नुकसान मात्र मानवेतचं होतं.

‘भगवान और खुदा’ असं या कवितेचं शीर्षक आहे

- Advertisement -

२ मिनटाच्या या व्हिडिओमध्ये मनोज बाजपेयी म्हणत आहेत की, ” भगवान आणि खुदा एकमेकांशी आपापसात बोलत होते. मंदिर आणि मस्जिदच्या मध्ये रस्त्यात भेटत होते. हात जोडलेले असावे किंवा दुआ करणारे असावे. याने काहीच फरक पडत नाही. कोणी मंत्र वाचते, कोणी नमाज करते. तेव्हा माणसाला लाज का वाटत नाही. जेव्हा तुझा धर्म कोणता? असं तो बंदूक दाखवून विचारतो, या बंदूकीतून निघालेली गोळी ना ईद मध्ये दिसते, ना होळीमध्ये दिसते.

- Advertisement -

या कवितेचे कवी मिलाप जावेरींनी सुद्धा या व्हिडिओवर आणि देशातील परिस्थितीवर आपलं मत मांडले. ही कविता २०२० मध्ये रिलीज झाली होती. परंतु आताच्या परिस्थितीवर ही कविता अगदी समर्पक ठरत आहे.


हेही वाचा : अभिनेत्री दिया मिर्जाने मुलांना मदत न केल्याने होतेय ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -