घरमहाराष्ट्रराणा दाम्पत्याला अडवलं तर मी जाऊन बाहेर काढणार, बघतो कोण अडवतं; आता...

राणा दाम्पत्याला अडवलं तर मी जाऊन बाहेर काढणार, बघतो कोण अडवतं; आता राणेंचं सेनेला चॅलेंज

Subscribe

राणा दाम्पत्य आणि शिवसेना वादात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहेत. माफी मागितल्याशिवाय राणा दाम्पत्यांना जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. त्यावर आता राणेंनी शिवसेनेला चॅलेंज दिलं आहे. राणा दाम्पत्याला अडवलं तर मी जाऊन बाहेर काढणार, बघतो कोण अडवतं, अशं ओपन चॅलेंज राणेंनी दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“अमरावतीमधून राणा दाम्पत्यांना मुंबईत येऊ देणार सांगितलं. ते दोघं मातोश्रीच्या समोर येऊन बसल्या. कुठे होती शिवसेना झोपली होती काय? मुंबई तुमची आहे काय? बढाया मारताय, शिवसेना आहे कुठे? हजारो शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर जमलेत म्हणून सांगतात. २३५ च्या पुढे एकही नाही. मी मोजायला मुद्दाम सांगितलं, राणांच्या घरासोमर १२५ शिवसैनिक आहेत. पोलीस संरक्षण असताना भिती वाटतेय काय? काय घेऊन जाईल अशी भिती वाटते? काय चालू आहे? याला राज्य चालवणं म्हणतात काय? जनतेला अन्न वस्त्र निवारा अशा गोष्टी द्यायच्या ऐवजी हे काय आहे? मुख्यमंत्र्यांना दुसरं काही समजत नाही. याला मारा, त्याला झोडा. राणा दाम्पत्याला घराबाहेर जायचं असेल तर जाऊ द्या, त्यांना कोणी अडवलं, जायला दिलं नाही, तर मी जाणार काही काळाने मी बाहेर काढणार राणांना. बघतो कोण येतं. मर्द आहात ना तुम्ही या तिकडे. राणांना मी फोन करणार आणि मदत हवी आहे का विचारणार,” असं नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

“महाराष्ट्रातलं वातावरण पाहिल्यावर ही पत्रकार परिषद घेत आहे. महाराष्ट्रात सरकार आहे असं वाटत नाही. सरकारी पक्षच महाराष्ट्रात, मुख्यत: मुंबईतलं वातावरण बिघडवताहेत. शिवसेनेच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदा पाहिल्यनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे हे संजय राऊत, अनिल परब या सर्वांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे की नाही याचं भान आहे की नाही. संजय राऊत स्मशानात व्यवस्था करुन ठेवा आम्हाला धमक्या द्याल तर परब यांनी सांगितलं जोवर माफी मागत नाहीत, तोवर राणा दाम्पत्यालांना जाऊ देणार नाही. या धमक्या देत असताना राज्यात पोलीस आहेत की नाही हा प्रश्न आहे. माफी नाही मागितली तर जाऊ देणार नाही, ही धमकी नाही, हा गुन्हा नाही,” असं नारायण राणे म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -