घरमनोरंजन'83' सिनेमा पाहून मसाबा झाली भावूक म्हणाली, माझा देश एका बाजूला आणि...

’83’ सिनेमा पाहून मसाबा झाली भावूक म्हणाली, माझा देश एका बाजूला आणि माझे वडील…

Subscribe

25 जून 1983 हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. लंडनमधील लॉर्डसच्या स्टेडीयमवर भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध सामना जिंकत क्रिकेट विश्वचषक आपल्या नावे केला होता. याच विजयगाथेवर आधारीत ’83’ हा सिनेमा शुक्रवारी 24 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. सिनेमाची घोषणा होताच प्रेक्षकांसह क्रिकेट प्रेमींना देखील हा सिनेमा पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. मात्र लॉकडाऊनमुळे हा सिनेमा लांबणीवर गेला पण सिनेमाच्या संपूर्ण टीमने हा ऐतिहासिक विषयावर आधारीत सिनेमा मोठ्या पडद्यावरच रिलीज करण्याचा निर्णय घेतला. 83 हा सिनेमा अनेक कलाकारांनी पाहीला आणि सिनेमाचं प्रचंड कौतुक देखील केलं आहे. तसेच हा चित्रपट वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू विवान रिचर्ड्स(Vivian Richards) आणि नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ताने(Masaba Gupta) देखील पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर मसाबाने अत्यंत भावनिक पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकांऊटवर शेअर केली आहे.(Masaba Gupta spoke about her father, West Indies cricketer Vivian Richards.)

मसाबाने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये तिने वडिलांचा लॉर्ड्सच्या मैदानात खेळतानाच फोटो पोस्ट केलाय. यासह तिने लिहले की, “माझ्या वडिलांना स्टेडियममध्ये कधीही खेळताना न पाहणे ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी खंत आहे.” मसाबा पुढे म्हणाली , “तेव्ही मी खूप लहान होते. मी नेहमी बोलते की माझा जन्म 6 वर्षांनी , खूप उशीरा झाला. मला हा ऐतिहासिक प्रतिष्ठित सामना पाहायला मिळाला नाही. माझा देश एका बाजूला आणि माझे वडील एका बाजूला” या आशयाचं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.

- Advertisement -

१९८३चा वर्ल्ड कप आणि कपिल देव यांच्या जीवनावर आधारित 83 हा सिनेमा आहे. सिनेमात कपिल देव यांची भूमिका   अभिनेता रणवीर सिंहने साकारली असून यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची फळी आहे. 24 डिसेंबर रोजी सिनेमा थिएटर्समध्ये दाखल झाला आहे.

- Advertisement -

हे हि वाचा –  Sunny Leone:’मधुबन में राधिका नाचे’ बेबी डॉलला नाचतांना पाहून साधू-संत भडकले

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -