घरमनोरंजन#MeToo: आलोकनाथांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

#MeToo: आलोकनाथांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Subscribe

ओशिवरा पोलिसांनी आलोक नाथ यांच्याविरुद्ध १७ ऑक्टोबर रोजी, कलम ३७६ या कलमातंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोक नाथ यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर, काही काळ ते चर्चेतून आणि माध्यमांच्या गराड्यातून जणू गायबच झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा हे प्रकरण प्रकाशझोतात आलं आहे. आलोकनाथ यांनी नुकताच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. मुंबईच्या दिंडोशी कोर्टामध्ये अलोकथानांनी हा अर्ज सादर केल्याचं समजतंय. दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांच्या तक्रारीवरुन आलोकनाथ यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आलोकनाथ यांनी दोन दशकांपूर्वी विनता नंदा यांच्यावर बलात्कार केल्याची तक्रार नंदा यांनी केली होती. त्यानुसार, ओशिवरा पोलिसांनी आलोक नाथ यांच्याविरुद्ध १७ ऑक्टोबर रोजी, कलम ३७६ या कलमातंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आता आलोकनाथ यांनी अटकपूर्व जामीनाचा अर्ज दिंडोशी कोर्टात सादर केला आहे.


पाहा : ‘गली गली’ गाण्यातील मौनी रॉयच्या हॉट अदा 

प्रसिद्ध टिव्ही मालिका निर्मात्या विनता नंदा यांनी #MeToo अभियान सुरु झाल्यानंतर फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहून स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. दोन दशकांपुर्वी स्वतःला संस्कारी बाबुजी म्हणवून घेणाऱ्या एका अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला होता, असे आलोक नाथ यांच्या नावाचा नामोल्लेख न करत त्यांनी आरोप केला होता. त्यानंतर विनता यांनी ८ ऑक्टोबर रोजी ओशिवरा पोलिस स्थानकात लेखी पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चौकशी करुन हा गुन्हा दाखल केला असल्याचे अतिरीक्त आयुक्त मनोज शर्मा यांनी सांगितले.

- Advertisement -

मानहानीचा दावा फेटाळला

विनिता नंदा यांनी आलोकनाथांवर लावलेल्या आरोपापानंतर, अभिनेत्री सोनी राजदानसह बॉलीवूडच्या इतरही काही अभिनेत्रींनी त्यांच्यावर गैरवर्तणुकीचा रोप केला होता. त्यामुळे याप्रकरणी आलोकनाथांच्या पत्नी यांनी दिंडोशी कोर्टात नंदा यांच्याविरोधात मानहानीचा अर्ज केला होता. मात्र, दिंडोशी सत्र न्यायालयाने ही मागणी साफ फेटाळून लावली. या प्रकरणी आलोकनाथ यांना सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन म्हणजचे सिंटाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाल्यामुळे त्यांना सिंटा मधून बाहेर काढण्याचा निर्णय असोसिएशनद्वारे घेण्यात आला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -