घरमनोरंजन'संस्कारी बाबा' आलोकनाथवर बलात्काराचा गुन्हा दाखल

‘संस्कारी बाबा’ आलोकनाथवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Subscribe

बॉलिवूडचे संस्कारी बाबा आलोकनाथ #MeToo चळवळीमुळे चांगलेच गोत्यात आलेले असताना त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. पोलिसांनी आलोक नाथ यांच्याव भादंवि कलम ३७६ या कलमातंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. प्रसिद्ध टिव्ही मालिका निर्माती आणि लेखिका विनता नंदा यांनी दोन दशकापूर्वी झालेल्या बलात्काराच्या घटनेला मी टू चळवळीच्या माध्यमातून मागच्या महिन्यात वाचा फोडली होती.

#MeToo; विंटा नंदा यांनी आलोकनाथ यांच्याविरुद्ध केली पोलिसांत तक्रार

- Advertisement -

प्रसिद्ध टिव्ही मालिका निर्मात्या विनता नंदा यांनी #MeToo अभियान सुरु झाल्यानंतर फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहून स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. दोन दशकांपुर्वी स्वतःला संस्कारी बाबुजी म्हणवून घेणाऱ्या एका अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला होता, असे आलोक नाथ यांच्या नावाचा नामोल्लेख न करत त्यांनी आरोप केला होता. त्यानंतर विनता यांनी ८ ऑक्टोबर रोजी ओशिवरा पोलिस स्थानकात लेखी पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चौकशी करुन हा गुन्हा दाखल केला असल्याचे अतिरीक्त आयुक्त मनोज शर्मा यांनी सांगितले.

- Advertisement -

His wife was my best friend. We were in and out of each other’s homes, we belonged to the same group of friends, most…

Posted by Vinta Nanda on Monday, 8 October 2018

आलोक नाथ यांचा विनता नंदाविरोधात मानहानीचा दावा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -