घरमनोरंजन'स्वयंवर मिका दी वोटी'चा पार पडला फिनाले, मिकाने १३ वर्षं जुन्या मैत्रिणीची...

‘स्वयंवर मिका दी वोटी’चा पार पडला फिनाले, मिकाने १३ वर्षं जुन्या मैत्रिणीची केली पत्नी म्हणून निवड

Subscribe

आकांक्षाने या स्वयंवरामध्ये प्रांतिका दास आणि नीत महल या दोघींना मागे टाकत मिका सिंहच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं

गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणारा हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरील ‘स्वयंवर मिका दी वोटी’ हा कार्यक्रमातील मिका सिंहला आता त्याची जोडीदार मिळालेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिका सिंहने त्याची जुनी मैत्रिण आकांक्षा पुरी हिची निवड केलेली आहे. आकांक्षाने या स्वयंवरामध्ये प्रांतिका दास आणि नीत महल या दोघींना मागे टाकत मिका सिंहच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. सूत्रांच्या मते, मिका सिंहला या तिघी सुद्धा फार आवडल्या होत्या. परंतु आकांक्षाने मिका सिंहचे मन जिंकून मीका सिंहच्या मनात स्थान निर्माण केले. दरम्यान, आकांक्षा आणि मिका सिंह खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतात.

अशातचं मिका दी वोटीच्या फिनालेमध्ये मिका सिंहने आकांक्षाची निवड केली. मात्र, आकांक्षा पुरीसोबत मिका सिंह या शोमध्ये स्टेजवर लग्न करणार नाही. मिका सिंहने सांगितले की, त्याने आकांक्षाला वरमाला घातली कारण त्याला आकांक्षा आवडते. परंतु तो काही दिवस आकांक्षा सोबत वेळ घालवणार आहे आणि त्यानंतरच सात फेरे घेतील. शिवाय ते आकांक्षाच्या कुटुंबातील लोकांना देखील भेटतील. खरंतर आकांक्षा आणि मीका गेल्या १३ वर्षांपासून चांगले मित्र आहेत. मिका दी वोटीमध्ये आकांक्षाने वाइल्ड कार्ट कंटेस्टेंट म्हणून एन्ट्री घेतली होती.

- Advertisement -

यादरम्यान, आकांक्षाने सांगितले की, जेव्हा तिने मिका सिंहला इतर मुलींसोबत पाहिले तेव्हा तिने या कार्यक्रमात येण्याचा निर्णय घेतला. तिने स्वताः चॅनला या शोमध्ये येण्यासाठी अप्रोच केलं होतं.


हेही वाचा :अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर भरणारा भारतीय कलाकार; आयकर विभागाकडून सन्मान

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -