घरमनोरंजनMiss Universe 2021 : २१ वर्षांनंतर भारताच्या हरनाज संधूला मिस युनिव्हर्स'चा किताब

Miss Universe 2021 : २१ वर्षांनंतर भारताच्या हरनाज संधूला मिस युनिव्हर्स’चा किताब

Subscribe

भारताच्या हरनाज संधूने जगातील अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धा ‘मिस युनिव्हर्स २०२१’ चा किताब आपल्या नावे केला आहे. यंदा ७० वी ‘मिस युनिव्हर्स’ सौंदर्यस्पर्धा इस्त्राइलमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ७५ हून अधिक सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.

मात्र ‘मिस युनिव्हर्स २०२१’ च्या टॉप १० मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हरनाज संधूने आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी अभिनेत्री लारा दत्ताने २००० मध्ये भारतासाठी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी हरनाजने मिस युनिव्हर्सचा किताब भारतात आणला आहे. त्यामुळे भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धेकांना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स २०२१’ चा किताब आपल्या नावे केला.  मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स २०२० अँड्रिया मेझा हीने हरनाजला तिचा मुकूट परिधान केला.

- Advertisement -

स्पर्धेच्या सुरुवातीला जजला आकर्षित केल्यानंतर हरनाजने स्विमसूट राऊंडच्या रॅमवर आत्मविश्वास आणि उत्तम खेळी दाखवली. आकर्षक मरून रंगाचा कॅप स्लीव्ह स्विमसूट परिधान केलेल्या हरनाजने सर्वांना प्रभावित केले आणि टॉप १० मध्ये आपले स्थान निश्चित केले.

- Advertisement -

या सौंदर्यस्पर्धेत पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतींना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर विजयी होता आले. मात्र भारताच्या हरनाजने ‘मिस युनिव्हर्स २०२१’ मध्ये टॉप फेव्हरेट स्पर्धक जागा मिळवत “मिस युनिव्हर्स २०२१’ वर आपले नाव कोरले.

हरनाजने २०१७ मध्ये टाईम्स फ्रेश फेस बॅकमधून तिच्या सौंदर्य स्पर्धांच्या प्रवासाला सुरुवात केली. 21 वर्षीय दिवा सध्या पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतेय. तिने फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ सह अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकला आहेत. यासोबत अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.


धक्कादायक! अल्पवयीन मोलकरीणीला चपलेने मारहाण, २५ वर्षीय अभिनेत्रीला मुंबईत अटक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -