घरमनोरंजनबॉलीवूडमधील करिअरपूर्वी सुमन रावला करायचंय 'हे' काम!

बॉलीवूडमधील करिअरपूर्वी सुमन रावला करायचंय ‘हे’ काम!

Subscribe

सुमन रावने या स्पर्धेपूर्वी फेमिना मिस इंडिया २०१९ चा किताब पटकावला होता. मिस वर्ल्ड स्पर्धेत तिला मिस एशिया म्हणून निवडण्यात आलं.

मिस वर्ल्ड स्पर्धेत तिसरा स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलेली भारताच्या सुमन राव बॉलीवूडमध्ये करिअर करण्याची शक्यता आहे. पण सुमन रावने या स्पर्धेपूर्वी फेमिना मिस इंडिया २०१९ चा किताब पटकावला होता. मिस वर्ल्ड स्पर्धेत तिला मिस एशिया म्हणून निवडण्यात आलं. सुमन रावला चित्रपट दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

सीए बनायचंय

एका मुलाखती दरम्यान सुमन रावला तिच्या भविष्यातील योजनांबाबत विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, “ती आता सीए परीक्षेची तयारी करत असून आपल्या अभ्यासावर तिला लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यानुसार सुमन रावला पहिल्यांदा सीए बनायचं आहे. त्यानंतर सुमनला फॅशन मॉडेलिंगमध्येसुद्धा नाव कमवायचे आहे. पण तिला बॉलीवूडमध्ये सुद्धा काम करायचे आहे.

View this post on Instagram

You are born to Change someone’s life , Don’t waste it . It could be touching one person’s life.. it could be many lives, what is required is the effort to give it your best. My BWAP is about uplifting women and giving them a social status that they deserve. They need their voice and they need their power to make decisions. And the ladies of @princessdiyakumarifoundation have earned this power . I am wearing this saree made by them . This is #PROJECTPRAGATI. They have worked many hours to make this, and I know that this is made with their threads of love and crystals of sweat. Looking at them standing independently on their feet swells my heart with pride and gratitude ???? Thank you PDKF ?? . . . #beautywithapurpose #bwap #projectpragati #missworld #missworld2019 #london #princessdiyakumarifoundation . . . Outfit – @princessdiyakumarifoundation Accessories – @hemakhasturilabel Fashion Director – @rockystarofficial Associate Stylist – @sheefajgilani Assisted by – @labelblive @aashi0812

A post shared by Suman Rao (@sumanratanrao) on

- Advertisement -

संधीचं सोनं करायचंय

बॉलीवूडमध्ये पदार्पणाबाबत विचार करत असशील तर तू कोणत्या अभिनेता, दिग्दर्शकासोबत काम करशील? या प्रश्नावर सुमन म्हणाली की, “मला माहीत आहे की प्रत्येकाला हि संधी मिळत नाही. त्यामुळे मी या व्यासपीठाचा सकारात्मकरित्या वापर करु शकते. त्याचप्रमाणे माझ्यासाठी येणाऱ्या संधींचा मी योग्य प्रकारे उपयोग करु इच्छिते, असे म्हणत सुमनने अभिनेता आणि दिग्दर्शकाचं नाव मात्र घेतलं नाही.

- Advertisement -

सुमन मूळची राजस्थानची

या वर्षी मिस वर्ल्ड स्पर्धेत सुमन रावने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेत तिने तिसरे स्थान पटकावले होते. यापूर्वी सुमन रावने मिस इंडियाचे मुकुट पटकावले होते. मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताच्या सुमन रावने ११७ देशांच्या सौंदर्यवतींवर मात करत स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते. राजस्थानच्या उदयपूर मधील एका गावात सुमन राहते. पण मागील काही वर्षांपासून सुमन मुंबईत राहत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -