घरमनोरंजन'पठाण' चित्रपटावर मुस्लीम समाज देखील नाराज; उलेमा बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला संताप

‘पठाण’ चित्रपटावर मुस्लीम समाज देखील नाराज; उलेमा बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला संताप

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार हिंदूंव्यतिरिक्त आता मुस्लीम समाजातील लोक देखील चित्रपटाला विरोध करु लागले आहेत.

उलेमा बोर्डकडून चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार
आता मध्यप्रदेशमध्ये उलेमा बोर्डचे अध्यक्ष सय्यद अनस अली यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, “या चित्रपटामुळे मुस्लीम समाजाच्या भावना देखील दुखावल्या आहेत. आम्ही या चित्रपटाला प्रदर्शित करणार नाही. हा मध्यप्रदेशमध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये देखील प्रदर्शित करु देणार नाही. मुस्लीम समाजात पठाण यांना खूप मानाचे स्थान आहे. या चित्रपटामुळे संपूर्ण मुस्लीम समाज बदनाम होत आहे. या चित्रपटाचे नाव पठाण आहे आणि महिला यामध्ये अश्लील नृत्य करत आहेत. चित्रपटामध्ये पठाण समाजाला चूकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे.”

- Advertisement -

सय्यद अली पुढे म्हणाले की, “चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव बदलायला हवे आणि शाहरुखने देखील आपल्या भूमिकेचे नाव बदलायला हवे. त्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे ते करा परंतु आता आम्ही हा भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही. आम्ही सेंसॉर बोर्डाशी संपर्क करण्याच प्रयत्न करु आणि चित्रपट प्रदर्शित नाही होणार याचा पुरेपूर प्रयत्न करु.”

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.


दीपिकाच्या अडचणीत वाढ; माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये तक्रार दाखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -