घरमनोरंजनमाझं लक्ष फक्त टाळ्यांवर आहे... ‘आदिपुरुष’च्या वाढत्या टीकेवर कृतीचं उत्तर

माझं लक्ष फक्त टाळ्यांवर आहे… ‘आदिपुरुष’च्या वाढत्या टीकेवर कृतीचं उत्तर

Subscribe

सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस उलटले आहेत. या चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. मात्र, रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. अशातच, या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृती सेननने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

कृतीने शेअर केला चित्रपटगृहातील व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

कृतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो एका चित्रपटगृहातील दिसत आहे. यामध्ये चित्रपट सुरु असताना काहीजण मोठ-मोठ्याने जय श्री राम जय श्री राम असं म्हणत आहेत. या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये कृतीने लिहिलंय की, “माझं लक्ष फक्त जयजयकार आणि टाळ्यांवर आहे! जय श्री राम” दरम्यान, आता कृतीच्या या पोस्टवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

‘आदिपुरुष’ने तीन दिवसांत कमावले 300 कोटी

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल 140 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 100 कोटी कमावले. तसेच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 64 कोटी कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत 300 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘आदिपुरुष’ने हिंदी बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत जवळपास 61.5 कोटी कमावले आहेत.

चित्रपटातील संवाद बदलले जाणार

‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये असलेले संवाद हे रामायण काळातील वाटत नसून छपरी वाटत होते. त्याबद्दल उसळलेला जनक्षोभ बघून आदिपुरुषचे निर्माता निर्देशक यांनी आदिपुरुषचे डायलॉग बदलण्याचे विचार जाहीर केले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आदिपुरुषचे संवाद हे सौम्य आणि सोज्वळ भाषेमध्ये ऐकायला येणार आहेत. लेखक मनोज मुंतशिर शुक्ला यांनी आदिपुरुषचे संवाद लिहिले असून, त्या संवादावरून बराच गदारोळ उठला होता.


हेही वाचा :

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -