घरमनोरंजन‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या त्यांच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची चाहते मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत. अशातच, निर्माता करण जौहरने या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे. यासोबतच करण जौहरने चित्रपटाच्या टीझरच्या प्रदर्शनाची तारीख शेअर केली आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या नव्या पोस्टरमध्ये आलिया आणि रणवीरचा लूक सुंदर दिसत आहे. या पोस्टरमध्ये आलिया लाल साडीमध्ये दिसत आहे शिवाय तिच्या नाकामध्ये नोज पिन घातलेली दिसत आहे. तसेच रणवीर सिंह देखील लाल रंगाच्या डॅशिंग आउटफिटमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचा टीझर 20 जून (उद्या) रोजी प्रदर्शित होणार असून 28 जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत करण जौहरने लिहिलंय की, “प्रेमाची केवळ सुरुवात झाली आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी टीझर उद्या प्रदर्शित होणार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

- Advertisement -

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून दोन्ही कलाकारांचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा हा चित्रपट 28 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन सारखे स्टार्स देखील दिसणार आहेत.


हेही वाचा : ‘आदिपुरुष’चा नवा रेकॉर्ड तीन दिवसांत कमावले 300 कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -