घरमनोरंजन'बाहुबली : बिफोर द बिगनिंग'ला नेटफ्लिक्सचा नकार

‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ला नेटफ्लिक्सचा नकार

Subscribe

चित्रपटाचे ७० % चित्रीकरण पुर्ण झाले.

एस. एस राजमौली दिग्दर्शित बाहुबली ‘द बिगनिंग’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धमाका केला होता. यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग बाहुबली २ हा पाहायला मिळाला होता. हे दोनही चित्रपटांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. बाहुबली आणि बाहुबली टू हे दोन्ही चित्रपट लोकप्रिय आहेत. बाहुबली टू हा प्रदर्शित होऊन अवघे ५ वर्ष पुर्ण झाली असून, अजूनही बाहुबलीची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये दिसून येते. आता ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहे. या चित्रपटात बाहुबलीची सुरुवात नेमकी कशी झाली, त्यात काय घडले यावर आधारित ही चित्रपट येत आहे. हा चित्रपट इतका लोकप्रिय असूनसुद्धा नेटफ्लिक्सने ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटाला नेटफ्लिक्सने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. याशिवाय या चित्रपटाचे ७०% चित्रीकरण पूर्ण झाले असून या चित्रपटाचे पुढील चित्रीकरण थांबवले आहे. बाहुबलीने बॉक्सऑफीसवर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ या चित्रपटाला नकार देण्यात आला याबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

एस.एस. राजमौली हे ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. तरी या चित्रपटाचे ७०% चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हे चित्रीकरण त्यांना न आवडल्यामुळे या चित्रपटाला त्यांनी नकार दिला आहे. यापूर्वी बाहुबलीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कधीकधी एखादा चित्रपट हीट होतो आणि त्याचे येणारे पार्ट हे फ्लॉप होतात. दरम्यान, ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ या चित्रपटाचे ७०% झालेले चित्रीकरण एखाद्या हिट चित्रपटाप्रमाणे नाही. त्यामुळे निर्माते या चित्रीकरणासाठी नाराज असून त्यांनी संपूर्ण चित्रीकरण पुन्हा करायला सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी नेटफ्लिक्सने २०० कोटी रुपये दिले आहेत. तरी पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत हा चित्रपटसुद्धा तितकाच दर्जेदार असावा, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. त्यामुळे निर्मात्यांनी आणि नेटफ्लिक्सने या चित्रपटासाठी नकार दिला. ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ या सीरीजमध्ये शिवगामी ची भूमिका अभिनेत्री मृणाल ठाकुर साकरणार होती. तिच्याऐवजी अभिनेत्री वामिका गब्बी हिला रिप्लेस करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Wamiqa Gabbi (@wamiqagabbi)

- Advertisement -


हेही वाचा – आता चूक झाली की शिरच्छेद करणार; आव्हाडांचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -