घरCORONA UPDATEनेटफ्लिक्सवर ‘Money Heist’ वेबसीरिज ठरतेय सुपरहिट; २० दिवसांत ६ कोटी व्ह्यूज

नेटफ्लिक्सवर ‘Money Heist’ वेबसीरिज ठरतेय सुपरहिट; २० दिवसांत ६ कोटी व्ह्यूज

Subscribe

नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली मनी हाइस्ट ही इंग्रजी वेबसीरिज सध्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असून गेल्या २० दिवसांत तब्बल ६ कोटींहून अधिक प्रेक्षकांनी ती पाहिल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरात लॉकडाऊन असताना घरात बसलेल्यांसाठी ऑनलाईन मनोरंजन हे जास्त उपयोगी ठरत आहे. टीव्हीप्रमाणेच प्रेक्षक हे नेटफ्लिक्स, प्राईम टाईम, झी ५, अॅमेझॉन सारख्या अॅप्सवरील चित्रपट आणि वेबसीरिजलाही सर्वाधिक पसंती देत आहेत. यामध्ये नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली मनी हाइस्ट ही इंग्रजी वेबसीरिज सध्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असून गेल्या २० दिवसांत तब्बल ६ कोटींहून अधिक प्रेक्षकांनी ती पाहिल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

मनी हाइस्ट या वेबसीरिजला लॉकडाऊनचा चांगलाच फायदा झाला आहे. भारतातील प्रेक्षकांमध्येही या सीरिजबाबत चांगलंच वेड पाहायला मिळत आहे. त्यामुळेच की या वेबसीरिजने अवघ्या २० दिवसांत कोटींचा प्रेक्षकवर्ग मिळवला आहे. हॉलीवूड रिपोर्टल वेबसाइच्या मते, ३ एप्रिल रोजी ही सीरिज प्रदर्शित करण्यात आली होती. आतापर्यंत या वेबसीरिजला ६.५ कोटी लोकांनी पाहिले आहे. तर याआधी प्रदर्शित झालेल्या ‘टायगर किंग: मर्डर’ ही सीरिज ३.४ कोटी प्रेक्षकांनी पाहिली आहे.

सध्या नेटफ्लिक्सवर इंग्रजीमध्ये दाखवली जाणारी मनी हाइस्ट ही सीरिज २०१७ साली स्पॅनिश भाषेत बनवण्यात आली होती. नेटफ्लिक्सवर नुकतीन प्रदर्शित झालेली डॉक्युमेंट्री मनी हाइस्ट: द फिनोमिना याचा उल्लेख करण्यात आला आहे की हा शो अपयशी ठरला होता. त्यानुसार मनी हाइस्टची निर्मिती आधी स्पॅनिश टीव्ही चॅनेल एँटिना ३ साठी करण्यात आली होती. सुरूवातील या शोला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मात्र हळूहळू हा शो फ्लॉप ठरत गेला.

- Advertisement -

दुसऱ्या सीजननंतर ही सीरिज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नेटफ्लिक्सने हा शो विकत घेतला आणि संपूर्ण जगाला दाखवण्याचे ठरवले. या सीरिजची कोणतीही जाहिरात त्यांनी केली नाही. मात्र स्पेनच्या बाहेरील लोकांनी हा सीरिज खुपच पसंत पडली. त्यामुळे अपयशी ठरलेला हा शो आता यशस्वी होताना दिसत आहे. त्यानंतर नेटफ्लिक्सच्या सहय्याने याचा तिसरा आणि चौथा सीजनदेखील बनवण्यात आला.

हेही वाचा –

अरे बापरे! भीष्म पितामह महाभारताच्या काळातही कुलर?, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -