घरट्रेंडिंगअरे बापरे! भीष्म पितामह महाभारताच्या काळातही कुलर? नेटकऱ्यांनी केले ट्रोल

अरे बापरे! भीष्म पितामह महाभारताच्या काळातही कुलर? नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Subscribe

भीष्म पितामह महाभारताच्या काळातही कुलर होता का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

लॉकडाऊनमध्ये खास लोकांच्या अग्रहाखातर दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या ९०च्या दशकातील मालिका पुन्हा दाखवायला सुरूवात केली आहे. दोन्ही मालिकांमुळे प्रेक्षकांनी मालिका आणि त्यातील कलाकारांचे कौतुक केले. तसेच या मालिकांमुळे प्रेक्षक वर्ग पुन्हा भुतकाळात रमला गेला. पण, त्या काळात कुलर होता का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

- Advertisement -

महाभारत मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांची भूमिका चांगलीच चर्चेत आली आहे. त्याला कारण म्हणजे महाभारत मालिकेच्या एका भागामध्ये मुकेश खन्ना यांच्यामागे चक्क कुलर दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी आता महाभारत काळापासून आपल्याकडे कुलर होते का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

 

दुर्योधनाने पुन्हा सारीपाट खेळण्याचा अट्टास केलेल्या मालिकेच्या भागामध्ये भीष्म पितामह यांच्या मागील बाजूस कुलर दिसल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. तसेच या भागाचा व्हिडिओ युट्यूबवर असून मालिकेच्या ४९ व्या भाग असणाऱ्या या व्हिडिओमध्ये ३२ मिनिटं ४७ सेकंदाला भीष्प पितामह यांच्यामागे कुलर दिसत आहे.

यावर एका नेटकऱ्यांनी कमेंट दिली आहे की, हा कुलर नसून ही भिंतीची डिझाईन आहे, पुन्हा एकदा पहा.
तर दुसऱ्या नेटीझन्सने सांगितले आहे की, १९५१ मध्ये कुलर होता. तसेच भीष्म पितामह विचार करत आहेत की, अपुन हिच भगवान है. तर अनेकांनी सांगितले आहे की, हा कुलर नसून हे सर्व खोट आहे.


हेही वाचा – वाढत्या शहरीकरणामुळे नव्या आजारांना निमंत्रण; ब्रीटनच्या शास्त्रज्ञांचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -