घरमनोरंजन'राधे श्याम' चे नवे पोस्टर प्रदर्शित

‘राधे श्याम’ चे नवे पोस्टर प्रदर्शित

Subscribe

महाशिवरात्रीनिमित्त 'राधे श्याम' या आगामी बहुप्रतिष्टीत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांनी ‘राधे श्याम’ या नवीन आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. ‘राधे श्याम’च्या या नव्या पोस्टरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ३० जुलै २०२१ रोजी ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. पूजा आणि प्रभास ची जोडी या चित्रपटात पहिल्यादाच पाहायला मिळणार आहे. हे कपल या चित्रपटात प्रेमाची एक अनोखी बाजू मांडताना दिसणार आहेत. प्रभासने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राधे श्याम चे पोस्टर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

पोस्टर शेअर करताना प्रभासने ‘महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर #Radheshyam चे नवीन पोस्टर तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यात मला आनंद होत आहे.’ असे म्हणत चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर केले आहे. चाहत्यांची याला चांगलीच प्रसिद्दी मिळाली आहे. राधे श्याम चे चित्रिकरण इटली आणि रोममध्ये झाले आहे. याआधी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी निर्मात्यानी या चित्रपटाची झलक मोशन पोस्टरसह प्रसिद्ध केली होती. ज्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. या चित्रपटातील प्रभासच्या केवळ वेशभूषेवर निर्मात्यांनी ६ कोटींपेक्षा जास्ता खर्च केला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रभासच्या आयुष्यातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे. ‘राधे श्याम’ हा राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट असेल. प्रभास आणि पूजा सोबत सचिन खेडकर, प्रियदर्शी , भाग्यश्री, मुरली शर्मा हे देखील मुख्य भूमिकेत दिसतील.

- Advertisement -

हे वाचा- मुलांसोबत डान्स करता करता जॉनी लिव्हर यांचा बॅलन्स बिघडला अन्….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -