काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवरून ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आजारपण आणि इतर काही कारणांनी शो सोडला असल्याचे निलेश साबळे यांनी सांगितले होते. चला हवा येऊ द्या नंतर निलेश साबळे आणि बाकीची मंडळी कुठे दिसणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र, निलेश साबळे पुन्हा एकदा नवा कॉमेडी शो घेऊन येत आहे. निलेश साबळे “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” हा नवा शो घेऊन येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर हा शो 20 एप्रिल पासून सुरू होणार आहे.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या नव्या कार्यक्रमातून विनोदाचे हे तीन हुकमी एक्के प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा नवा कार्यक्रम ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या विनोदी कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा म्हणजेच कॅप्टन ऑफ द शीप असणार आहे निलेश साबळे.
डॉ. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची नवी सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठीवर धावणार आहे. डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांचे अनेक दिवाने आहेतच पण बॅालीवूडमध्येही डॅा निलेश साबळे यांनी सगळ्या सुपरस्टार्सना आपल्या कॅामेडीचे जबरदस्त फॅन केले. डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट “हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!” या कार्यक्रमात दिसणार आहेत. तर भाऊ कदम आणि ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार देखील दिसणार आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी प्रत्येक एपिसोडमध्ये असणार आहेत.”हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!’ हा शो कलर्स मराठीवर 20 एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे.
____________________________________________________
टॉप व्हिडिओज्