घरमनोरंजनपुरुषोत्तम करंडक : एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नऊ संघाची निवड

पुरुषोत्तम करंडक : एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नऊ संघाची निवड

Subscribe

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नऊ संघाची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीसाठी ५१ संघ सहभागी झाले होते. तर १४ आणि १५ सप्टेंबर रोजी स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूर देसाई यांनी आकाशावाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

श्री काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय, (टॅन्जंट), न्यू आर्टस, काॅमर्स आणि सायन्स काॅलेज, सर परशूराम महाविद्यालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, प. भू. वसंतदादा पाटील इन्सिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, फग्युसन महाविद्यालय, स. भू. बाबूराव उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालय अशी अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या महाविद्यालयांची नावे आहेत. प्राथमिक फेरीसाठी नितीन धंदुके, अनिल दांडेकर आणि अश्विनी देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -