घरमहाराष्ट्रकोकणातील खड्डयांसह विरोधकांचेही करणार विसर्जन - आमदार लाड

कोकणातील खड्डयांसह विरोधकांचेही करणार विसर्जन – आमदार लाड

Subscribe

‘कोकणातील खड्डयांसह विरोधकांचेही विसर्जन करणार’, असे प्रतिपादन आमदार प्रसाद लाड यांनी आज केले. त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्ग शहरातील विद्यामंदिर हायस्कुल मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. आमदार लाड यांनी आज पाहणी दरम्यान आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा प्रदेश चिटनिस राजन तेली, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, संदेश पटेल आदी उपस्थित होते.

महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजानादेश यात्रा सुरु आहे. महाजनादेश यात्रेच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरात फिरुन मतदारांना आवाहन करत आहेत. राज्यातील प्रत्येक भागात फिरुन त्या भागातील समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या महाजनादेश यात्रेचे नियोजन केले आहे. याशिवाय विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही महाजनादेश यात्रा महत्त्वाची आहे. या महाजनादेश यात्रा दोन टप्प्यात पार पडली आहे. दुसऱ्या टप्प्याच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. गृहमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अमित शहा पहिल्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्र दौरा करु गेले. मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. आता भाजपची महाजनादेश यात्रा तिसऱ्या टप्प्यात सुरु झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -