घरमनोरंजनVideo: नोराचा हॉट लूक पाहून वरुण म्हणतो 'एसी लावा'

Video: नोराचा हॉट लूक पाहून वरुण म्हणतो ‘एसी लावा’

Subscribe

नुकतचं प्रदर्शित झालेल्या या गाण्याला २ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिच्या डान्स स्टाईलनं घायाळ केलं आहे. नुकतचं तिचं ‘गर्मी साँग’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. हे नवीन गाणं पाहून तिने लोकांची मनं जिंकली आहे. ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ या चित्रपटातील हे गाणं फक्त युट्यूबवरचं नव्हे तर सोशल मीडियावर देखील लोकप्रिय झालं आहे. ‘दिलबर’ आणि ‘साकी-साकी’ या गाण्याप्रमाणेच नोराचा या गाण्यामध्ये देखील वेगळ्याच अंदाज पाहायला मिळतं आहे. या गाण्यात नोरा लाल रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली आहे. तसंच हे गाणं बादशाह आणि नेहा कक्कडने गायलं आहे.

या गाण्यातील नोराची स्टाईल पाहून वरुण धवनदेखील स्वतःला रोखू शकला नाही. तो असं म्हणाला, ‘अरे यार कोणीतरी लवकर ऐसी लावा.’ विशेष म्हणजे नुकतचं प्रदर्शित झालेल्या या गाण्याला २ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच चाहते देखील खूप प्रतिक्रिया देत आहेत.

- Advertisement -

लवकरच नोरा ही वरुण धवन आणि श्रद्धा कपूरसोबत ‘स्ट्रीट डान्सर ३ डीट’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केलं आहे. तसंच टी सीरीज निर्मितीखाली हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – FlashBack 2019: मराठी चित्रपटांसाठी कसं गेलं हे वर्ष?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -