घरमनोरंजनमी चांगली पत्नी नाही; देसी गर्लची कबुली

मी चांगली पत्नी नाही; देसी गर्लची कबुली

Subscribe

'माझा आणि कुकिंगचा दूरपर्यंत संबंध नाही. त्यामुळे मी एक चांगली पत्नी नाही', अशी कबुली प्रियांकांने यावेळी दिली. 

देसी गर्ल प्रियांका चोप्राने हॉलीवूडमध्येही आपली छाप उमटवली आहे. सध्या प्रियांका तिचा पती निक जोनससोबत अमेरिकेतच वास्तव्याला असून, ती हॉलीवूडचे काही टीव्ही शो आणि चित्रपट प्रोड्युस करत असल्याची चर्चा आहे. दरम्याान, प्रियांका नुकतीच एका टॉक शोमध्ये गेली होती. यावेळी ‘परफेक्ट वाईफ अर्थाच चांगल्या पत्नीची तुमची व्याख्या काय?’ असा प्रश्न तिला विचाण्यात आला. यावर उत्तर देताना ‘मी चांगली पत्नी नाही’ अशी कबुली पि.सी.ने दिली. ‘मी स्वत:ला वाईट पत्नी म्हणून घेते. एका चांगल्या पत्नीने पाककलेत निपुण असणं गरजेचं असतं. भारताप्रमाणेच पाश्‍चिमात्य देशांमध्येही ही गोष्ट गृहित धरलेली असते. माझ्या आईच्या तसंच नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, पत्नीचा पाककलेत हातखंडा नसला तरी किमान रोजचं साधं जेवण बनवता येणं तर गरजेचंच असतं. मात्र, माझा आणि कुकिंगचा दूरपर्यंत संबंध नाही. त्यामुळे मी एक चांगली पत्नी नाही’, अशी कबुली प्रियांकांने यावेळी दिली.

प्रियांका मुलाखतीदरम्यान म्हणाली की, ‘मला अजिबातच जेवण बनवता येत नाही. मी लग्नाच्यावेळी निकलाही याची कल्पना दिली होती. मी त्याला सांगितले होते की तुला आईच्या हातचे चविष्ट पदार्थ खाण्याची सवय आहे. मात्र, तु अशा मुलीशी लग्न करत आहे की जिला पाककलेचा गंध नाही. मला स्वयंपाकघरात फक्त अंड उकडता येतं. मात्र, त्यावर मलाही स्वयंपाक येत नसल्याचं सांगत, आपण अंडी खाऊन राहू अशी गमतीशीर प्रतिक्रिया निकने दिली होती’, असंही प्रियांका यावेळी म्हणाली.

- Advertisement -

आता प्रियांकाला जरी स्वयंपाकाची ‘कला’ येत नसली तरी अभिनय, गाणं, डान्स अशा अनेक कलांमध्ये ती चांगलीच माहिर आहे, यात काहीच शंकाच नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -