घरदेश-विदेशमी पुरुषांसोबत झोपणार नाही - काँग्रेस नेता

मी पुरुषांसोबत झोपणार नाही – काँग्रेस नेता

Subscribe

मी पुरुषांसोबत झोपणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य एका काँग्रेस नेत्याने केले आहे. रमेश कुमार असे या नेत्याचे नाव आहे.

कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते रमेश कुमार आपल्या वादग्रस्त विधनांनी नेहमी चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. एच. मुनियप्पा यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. मुनियप्पा यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे या वक्तव्यावर भविष्यात राजकीय चिखलफेक होण्याची दाट शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी मुनियप्पा यांनी रमेश कुमार यांच्यात कुठलाच वाद नसल्याचे सांगितले होते. या संदर्भात ते म्हणाले होते की, ‘रमेश कुमार आणि आम्ही पती-पत्नीप्रमाणे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही.’ त्यांच्या याच विधानावर रमेश कुमार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही. मी कोणासोबतही झोपत नाही. माझी एक पत्नी असून गेल्या दहा वर्षांपासून मी विवाहीत आहे. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपण्यात रस असू शकतो, मात्र माझी तशी इच्छा नाही. माझे कोणाशीही कोणतेच संबंध नाहीत.’ मुनियप्पा यांना लोकसभेचे तिकीट मिळू नये, यासाठी रमेश कुमार यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -