घरमनोरंजनProject K मध्ये कमल हसनची एन्ट्री, खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Project K मध्ये कमल हसनची एन्ट्री, खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Subscribe

साउथ सुपरस्टार प्रभास हा त्याचा सिनेमा ‘आदिपुरुष’ मुळे अधिक चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण सिनेमातील कलाकारांवर ही जोरदार टीका करण्यात आली. याच दरम्यान, प्रभासचा आगामी सिनेमा ‘प्रोजेक्ट के’ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार सिनेमात साउथचा दिग्गज अभिनेता कमल हसन हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रोजेक्ट के मध्ये उत्तम ग्राफिक्सचा वापर केला जात आहे. सिनेमाचे दिगदर्शक नाग अश्विन यांनी यासाठी फार मेहनत घेतली आहे. प्रभास स्टारर असलेल्या या सिनेमाच्या निर्मात्यांनी याचे जवळजवळ 70 टक्के शुटिंग पूर्ण केले आहे. दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांची सुद्धा काही आठवड्यांचे शूट अद्याप शिल्लक आहे.

- Advertisement -

Tweet:

- Advertisement -

आधीपासूच चर्चा केली जात होती की, विक्रम स्टार कमल हसन हा प्रभासच्या प्रोजेक्ट के मध्ये खलनायकाची भुमिका साकारणार असून त्यासाठी तो 50 कोटी घेणार आहे. त्याचसोबत असे ही म्हटले जातेय की, मुख्य अभिनेत्याच्या रुपात प्रभासला जी फी दिली जात आहे ती त्यापेक्षा दुप्पट आहे. कमल हसन या सिनेमात झळकणार असल्याने त्याच्या चाहत्यांना त्याला पाहण्याची फार उत्सुकता लागली आहे.

प्रोजेक्ट के हा बिग बजेट सिनेमा असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचे बजेट जवळजवळ 500 कोटींचे आहे. त्यामुळे या सिनेमाला भारतीय सिनेमातील सर्वाधिक महागडा सिनेमा असल्याचे म्हटले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या मेकर्सने एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला होता, तो पाहून चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा- ‘प्रोजेक्ट के’च्या सेटवरुन अमिताभ यांचा लूक लीक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -