घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरअरेरे! ओवैसींसोबत बसण्यासाठी MIM च्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर रोखल्या बंदुका?

अरेरे! ओवैसींसोबत बसण्यासाठी MIM च्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर रोखल्या बंदुका?

Subscribe

मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नुकताच छत्रपती संभाजी नगर शहरात दौरा केला. मलकापूर येथील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी ओवेसी संभाजी नगरमध्ये आले होते. मात्र ओवेसी या कार्यक्रमाला जात असताना एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांशीच भिडले. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बंदुका रोखल्याची माहिती समोर येत आहे. अशाप्रकराचे एकाच पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांवर बंदुका रोखल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (asaduddin owaisi chhatrapati sambhaji nagar visit mim party workers scuffle pointed gun at each other vvp96)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरात आलेले खासदार ओवेसी हॉटेलमधून खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी गेले. तेथून निघत असताना ओवेसी यांची गाडी पुढे निघाली. या गाडीच्या ताफ्यात बसण्यावरून काही कार्यकर्ते आपसात भिडले. या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बंदुकाही रोखलयाची माहिती समोर आली. मात्र या माहितीचे ‘एमआयएम’च्या वरिष्ठ नेत्यांनी खंडण केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : ठाकरेंच्या इशाऱ्याला फडणवीसांचे उत्तर;’आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही, घुसलोच तर…’

दरम्यान, छत्रपती संभाजी नगर येथे आल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नुकताच विरोधकांच्या बैठकीला न बोलवण्यावरून खंत व्यक्त केली. बिहारमध्ये भाजपाविरोधात विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलविण्यात आली. मात्र, अल्पसंख्यांक, दलित आणि आदिवासींच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या पक्षाला या बैठकीला बोलावले नाही. भाजपविरोधी आघाडी ‘एमआयएम’शिवाय अपूर्ण आहे,’ असा इशारा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिला. भाजपाला रोखण्यासाठी या आघाडीकडे कृती कार्यक्रम (अजेंडा) नसल्याचीही टीका त्यांनी केली.

- Advertisement -

याशिवाय, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात औरंगजेबच्या चित्रावरून झालेल्या वादाबद्दल पत्रकारांनी ओवेसी यांनी प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना “राज्य सरकारने कोणाचे फोटो वापरावे किंवा कोणाचे वापरू नये यासाठी कायदा करावा. सत्तेत कोणाचा पक्ष येईल आणि कोणाचा पक्ष जाईल, हे होत राहील. मात्र, राज्याची कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनी दंगेखोर किंवा दंगे भडकाविणाऱ्यांवर कडक कारवाई करून शांतता राखण्यासाठी काम केले पाहिजे”, असे खासदार ओवेसी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -