घरमनोरंजनरजनीकांत-अक्षयचा बिग बजेट 2.0 चित्रपट ऑनलाईन लीक

रजनीकांत-अक्षयचा बिग बजेट 2.0 चित्रपट ऑनलाईन लीक

Subscribe

५१४ कोटी रुपये बजेट असेलाला हा चित्रपट भारतातील पहिला बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत आणि अक्षय कुमार व्यतिरीक्त एमी जैक्सन यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत आणि बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार यांचा चित्रपट 2.0 रिलीज होण्याच्या काही तास आधी लीक झाल्याचे समोर आले आहे. मद्रास हायकोर्टाने इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या १२,००० वेबसाईटला बंदी घालण्याचे आदेश देऊन सुध्दा 2.0 चित्रपट लीक झाला आहे. तमिल रॉकर्स या वेबसाईटवर हा चित्रपट लीक झाल्याचे समोर आले आहे. तमिळ रॉकर्स ही लोकप्रिय वेबसाईट असून याआधी ठग्‍स ऑफ हिंदोस्तान, सुई धागा, अंधाधुन, सरकार आणि ‘नोटा’ यासारखे चित्रपट त्यांनी लीक केले होते. जवळपास ५१४ कोटी रुपये बजेट असेलाला हा चित्रपट भारतातील पहिला बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत आणि अक्षय कुमार व्यतिरीक्त एमी जैक्सन यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.

तमिल रॉकर्स साईटवर चित्रपट लीक

2.0 हा चित्रपट लीक होऊ नये यासाठी अनेक प्लान तयार केले होते मात्र तरी देखील हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही तास आधीच लीक झाला आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे निर्माते चिंतेत आले आहे. कारण त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होणार आहे. हा चित्रपट तमिल रॉकर्स या पायरेसी वेबसाईटवरुन लीक झाला आहे. तमिल रॉकर्सच्या नावावरुन अधिकृत नसलेल्या एका ट्विटर अकाऊंटवरुन 2.0 ला लीक करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर या वेबसाईटने याप्रकरणी स्पष्टीकरण देत त्यांनी आमचे ट्विटर हँडल नसल्याचे सांगितले.

- Advertisement -

पायरेटेड प्रिंट पाहू नका

दरम्यान, काही पायरेसी वेबसाईट चित्रपटाला फ्रीमध्ये दाखवतात तसंच डाऊनलोड करण्याचा देखील दावा करत आहेत. 2.0 चित्रपटाचा एचडी प्रिंट सध्या ऑलाईन उपलब्ध आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या फॅन्सनी पायरेटेड प्रिंट पाहू नका असे जनतेला आवाहन केले आहे. 2.0 चित्रपट लीक होऊ नये यासाठी निर्मात्याकडून १० लोकांची एक टेक्निकल टीम नियुक्त करण्यात आली होती. मात्र तरी देखील चित्रपट लीक झाला आहे त्यामुळे निर्माते चिंतेत आले आहेत.

हेही वाचा – 

- Advertisement -

यांत्रिकी सुख, भास की धोका? अतुलनीय अनुभवाचा २.०

रोबोट २.० – प्रदर्शित होण्यापूर्वीच केली तब्बल ३७० कोटींची कमाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -