घरक्राइमदहशतवादी Masood Azhar ठार? पाकिस्तानी पत्रकार म्हणते, हम बोलेगा तो बोलोगे कि...

दहशतवादी Masood Azhar ठार? पाकिस्तानी पत्रकार म्हणते, हम बोलेगा तो बोलोगे कि…

Subscribe

नवी दिल्ली : भारताचा मोठा एक शत्रू आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख काल, सोमवारी पहाटे 5 वाजता मारला गेला. पाकिस्तानातील बहावलपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने देखील ही बातमी सोशल मीडियावर शेअर करताना, ‘हम बोलेगा तो बोलोगे कि…’

हेही वाचा – BHU Rape Case : भाजपाचे खरे चालचरित्र हेच आहे, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनंतर आता संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. डिसेंबर 1999 मध्ये, इंडियन एअरलाइन्स IC814 या विमानाचे अपहरण करून ते अफगाणिस्तानातील कंदहारला नेण्यात आले, त्यावेळी प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांना सोडण्यात आले होते. भारतीय संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहर होता.

- Advertisement -

पाकिस्तानी पत्रकार आरझू काझमी यांनी ही बातमी शेअर केली आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर अज्ञातांनी केलेल्या बॉम्बस्फोटात ठार झाल्याचे त्यात म्हटले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा भावलपूर मशिदीतून परतत असताना हा स्फोट घडल्याचे वृत्तात म्हटले आहे. याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, ही बातमी शेअर करताना आरझू काझमी यांनी लिहिले आहे की, ‘हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है…’

हेही वाचा – Dharavi Redevelopment Project: धारावीचा होणार कायापालट; पुनर्विकासासाठी अदानी समूहाचा ‘असा’ आहे प्लॅन

विशेष म्हणजे, आरजू काझमी यांच्या ट्वीटनंतरच दाऊद इब्राहिमच्या विषप्रयोगाच्या बातमीने जोर पकडला होता. दाऊदला कोणीतरी विष दिले आणि त्याच्यावर कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सोशल मीडियावर सांगिले जात होते. मात्र, त्या वृत्ताला देखील अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. पाकिस्तान सरकारने या वृत्तावर मौन बाळगले आहे. या वृत्ताचे खंडन किंवा पुष्टी सरकारने केली नाही, असे आरजू काझमी यांनी त्यावेळी म्हटले होते. आता पुन्हा मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यालाही दुजोरा मिळालेला नाही.

या आधीही दोन वेळा मसूदच्या मृत्यूची बातमी

मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी 2019मध्ये दोन वेळा पसरली होती. मार्च 2019मध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी, मसूद अझहर गंभीर आजारी असून सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर इलाज सुरू असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमी काहींनी लिव्हरच्या कर्करोगमुळे मसूद अझहर याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. तर, भारताने जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या हल्ल्यात अझहरचा मृत्यू झाल्याचे काही प्रसारमाध्यमांचे म्हणणे होते. पण नंतर ती अफवा असल्याचे समोर आले. त्यानंतर, जून 2019मध्ये रावळपिंडी येथे सैन्याच्या रुग्णालयामध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात अझहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले होते.

हेही वाचा – मविआचा फॉर्म्युला फिक्स? लोकसभेसाठी जागावाटप ठरले, शिक्कामोर्तब बाकी – सुप्रिया सुळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -