घरट्रेंडिंगरामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या वेळ आणि दिवस

रामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या वेळ आणि दिवस

Subscribe

रामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या वेळ आणि दिवस

कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनचा पुन्हा एकदा इतर क्षेत्राप्रमाणे सिनेसृष्टीलाही मोठी फटका बसत आहे. सध्या सर्व सिनेमा, मालिकांचे शुटींग बंद आहेत. तर काही जण काळजी घेऊन राज्याच्या बाहेर जाऊन शुटींग करत आहेत. त्यामुळे घरी बसलेल्या प्रेक्षकांना मालिकांचे रिपीट एपिसोड पहावे लागत आहेत. त्यामुळे प्रेक्षकही कंटाळले आहेत. मात्र प्रेक्षकांचा कंटाळा दूर करण्यासाठी नव्वदच्या दशकात सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारी ‘रामाणय’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवंगत रामानंद यांची ब्लॉकबस्टर पौराणिक रामायण ही मालिका पुन्हा सुरु होत असल्याने प्रेक्षकांच्या मनातही जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

रामायण ही मालिका १९८७ साली दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आजही रामायणाबद्दलच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनदरम्यान रामायण पुन्हा दाखवण्यात आले होते. तेव्हाही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी मालिकेला प्रतिसाद दिला होता. यावेळी कलर्स वाहिनीवर गुरुवारपासून रामायण मालिका प्रसारित होण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

रामायणातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. आता पुन्हा एकदा रामाच्या रुपात असलेले अभिनेते अरुण गोविल,सीता दीपिका चिखलिया, लक्ष्मणाच्या रुपात अभिनेते सुनिल लहरी, रावणाच्या वेशात असलेले अभिनेते अरविंद त्रिवेदी आणि हनुमानाच्या रुपात अभिनेते दारा सिंह या कलाकारांना पाहण्याची संधी पुन्हा प्रेक्षकांना मिळणार आहे.

मालिकेत रावणाची भूमिका करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र त्या नंतर रामायण मालिकेतील लक्ष्मणाची भूमिका करणारे अभिनेते सुनिल लहरी यांनी एक पोस्ट करुन ही अफवा असल्याचे सांगितले. अरविंद जी यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना करा असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटीलचं कोरोनानं निधन

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -