घरमनोरंजनसुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटीलचं कोरोनानं निधन

सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटीलचं कोरोनानं निधन

Subscribe

देशातील प्रत्येक कोनाकोपऱ्यातून कोरोना बाधितांची नोंद करण्यात येत आहे. देशात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोना संसर्गामुळे बर्‍याच लोकांचा बळी जात आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकही कोरोनाच्या विळख्यात सापडत असून त्यांचाही मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. अशातच वाईट बातमीची मालिकाही सतत सुरू आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाची सह अभिनेत्री असलेल्या अभिलाषा पाटील हिचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. वयवर्ष अवघं ४० असणारी अभिनेत्री अभिलाषा पाटील हिने अनेक हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे. अभिलाषाचे बुधवारी संध्याकाळी कोरोनाच्या संसर्गाने मुंबईत निधन झाले. तिच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे.

उत्तर प्रदेशमधील बनारस शहरात गेल्या काही दिवसांपासून अभिलाषा पाटील वेब शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र तिथे शूटिंगदरम्यान तब्येत अचानक बिघडली होती. तब्येत बिघडल्यामुळे ती मुंबईला निघून आली. मुंबईत आल्यानंतर तिने कोरोनाची टेस्ट केली होती. या कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिलाषावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. तब्येत खालावल्यामुळे तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, मात्र दिवसेंदिवस तब्येत आणखी बिघडली आणि अखेर अभिलाषाचे निधन झाले.

- Advertisement -

मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अभिलाषा पाटीलने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘छिछोरे’, ‘गुड न्यूज’, ‘मलाल’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या होत्या. यासोबतच अभिलाषाने ‘बायको देता का बायको’, ‘ते आठ दिवस’, ‘प्रवास’, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’, ‘पिप्सी’ अशा अनेक मराठी चित्रपटांत तिने काम केलं होतं. ‘बापमाणूस’ ही त्यांच्या लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त अभिलाषाने डिज्नी हॉटस्टारच्या वेब शो ‘क्रिमिनल जस्टिस’ च्या दुसर्‍या सीजनमध्येही काम केले होते.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -