घरमनोरंजन'सिम्बा' रणवीर सिंगची 'थुकरटवाडी'त एंट्री!

‘सिम्बा’ रणवीर सिंगची ‘थुकरटवाडी’त एंट्री!

Subscribe

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सिम्बाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये येणार आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सिम्बाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये येणार आहे. नुकतेच या संदर्भातील काही व्हिडिओ झी मराठीच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या खट्याळ आणि खोडकर स्वभावासाठी ओळखला जातो. तर थुकरटवाडीतील धमाल मस्तीदेखील प्रेक्षकांच्या सवयीची आहे. त्यामुळे जेव्हा मस्तीखोर रणवीर या शोमध्ये येईल, तेव्हा कार्यक्रमाची एनर्जी द्विगुणीत होईल, यात शंका नाही. रणवीर सिंग आणि सारा अली खान यांचा  सिम्बा हा चित्रपट २८ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शीत होणार आहे.

झी मराठी फेसबुकवरील पोस्ट व्हिडिओ

- Advertisement -

बहुतांश मराठी कलाकार 

रोहित शेट्टीचा सिंघम चित्रपट याचाच पुढील भाग म्हणून सिम्बाकडे पाहिले जाते. त्यामुळे मराठी पार्श्वभूमी असलेल्या सिंघमप्रमाणेच सिम्बा चित्रपटातही बहुतांश मराठी कलाकार आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधव, वैदेही परशूरामी, सौरभ गोखले, विजय पाटकर, नंदू माधव यांच्यासह इतर कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. तर रणवीरची भूमिकाही संग्राम भालेराव या मराठमोळ्या पोलिसाची आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आहे.

- Advertisement -

बॉलीवूड स्टार्सची हजेरी 

पहिल्या व्हिडीओमध्ये रणवीर ‘रामलीला’ सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत तो ‘पद्मावत’ सिनेमातील हबीबी आणि ‘सिम्बा’ सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘लवकरच भेटूया सिंबाला थुकरटवाडीत’ असं लिहीण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच रणवीरसहीत सिनेमाची संपूर्ण टीम ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर दिसू शकते. चला हवा येऊ द्या मध्ये बॉलिवूडमधील मोठे कलाकार येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही थुकरटवाडीमध्ये शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम, अक्षय कुमार, इरफान खान, अजय देवगण, रितेश देशमुख यासारख्या मंडळींने हजेरी लावली आहे. या यादीमध्ये आता रणवीरचाही समावेश होणार आहे.

हे वाचा –

‘सिम्बा’ प्रदर्शित झाल्यावर दीपिका जाणार हनिमूनला!

सिम्बामध्ये ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री!

‘चला हवा येऊ द्या’ वर आगरी समाजाचा आक्षेप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -