घरमनोरंजनलीटल सुगंधाला मोठे गीफ्ट

लीटल सुगंधाला मोठे गीफ्ट

Subscribe

कुठल्या एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये मुला-मुलीने अंतिम टप्पा गाठला की भाग्य उजळते हे पालकांना आता कळून चुकले आहे. एकवेळा शिक्षणाच्याबाबतीत तडजोड करतील पण आपली मुलगी किंवा मुलगा रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसायला पाहिजे यासाठी पालकांची मोठी धडपड असते. चॅनलवालेसुद्धा मुलांमध्ये निराशा निर्माण होऊ नये म्हणून थोडेसे जागरुक राहुनच कार्यक्रमाची आखणी करत असतात. अर्थात हे करत असताना टीआरपी कसा वाढेल हेही ते पहात असतात. हिंदी झी वाहिनीवर सारेगमप लीटल चॅम्प हा रिअ‍ॅलिटी शो दाखवला जातो. सुगंधा दाते ही या शोची स्पर्धक आहे. लीटल सुगंधाला मोठे गिफ्ट मिळाले आहे.

रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी कोण होणार यावर कार्यक्रमाची संकल्पना अवलंबून असते. टोटल धमाल या चित्रपटातील कलाकार या रंग़मंचावर एकत्र आले होते. अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अजय देवगण यांचा या चित्रपटामध्ये सहभाग आहे. त्यावेळी सुगंधाला हम दिल दे चुके सनम हे गाणे गायला लावले होते. माधुरी या गाण्याने इतकी प्रभावीत झाली की तिने लागलीच लीटल श्रेया घोषाल असा किताब देऊन सुगंधाची प्रशंसा केली. हे कौतुक येवढ्यावरच थांबले नाही तर या लीटल चॅम्पचा परीक्षक अमाल मलिक याने तर चक्क आपल्या पुढच्या संगीत दिग्दर्शनात चित्रपटातील एक गाणे गाण्याची संधी तिला देण्याचे कबूलही केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -