घरमुंबईबोगस कॉलसेंटरद्वारे विदेशी नागरिकांची फसवणूक

बोगस कॉलसेंटरद्वारे विदेशी नागरिकांची फसवणूक

Subscribe

वॉण्टेड असलेल्या पार्टनरला अटक व कोठडी

बोगस कॉल सेंटरद्वारे विदेशी नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या कंपनीच्या एका पार्टनरला शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. तौफिक रफिक शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यात डेव्हीड जॉर्ज अल्फान्सो, संदीप धनुषधारी यादव, बिपीन रामतिर्थ गुप्ता ऊर्फ साहू, डेल सॅबी जसिन्टो आणि शादाब मेहमूद शेख यांचा समावेश आहे.

बोगस कॉलसेंटरद्वारे काही विदेशी नागरिकांची फसवणुक करणारी एक टोळी असून ही टोळी अंधेरी परिसरात कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी 6 सप्टेंबर 2018 रोजी या पथकाने अंधेरीतील एस. व्ही रोडवरील सबवेसमोरील वेस्ट इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या मेसर्च एक्सफीनिटी कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान पोलिसांनी तिथे एकोणचाळीस संगणकावर काम करीत असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

या संगणकाची तपासणी केली असता ते सर्वजण विदेशी नागरिकांचा अनधिकृपणे डाटा प्राप्त करुन त्याद्वारे व्हिओआयपी कॉल आणि ई-मेलद्वारे स्वतविषयी खोटी माहिती देऊन व्हायरल/मालवेअर क्लिन करण्याचे तसेच संगणक सॉफ्टवेअरद्वारे संगणक दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करीत असल्याचे दिसून आले. एक्सफीनिटी ही वेबसाईट मनोरंजन करणारी नोंदणीकृत वेबसाईट आहे. मात्र त्याच्या नावावर तिथे काम करणारे आरोपी विदेशी नागरिकांची फसवणूक करीत होते. या टोळीने आतापर्यंत अनेक विदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते.

याच गुन्ह्यांत नंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत तौफिक शेख याचे नाव समोर आले होते. तौफिक हा कंपनीचा पार्टनर असून तो या घटनेनंतर पळून गेला होता. अखेर त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. तौफिक हा बिपीनसोबत कंपनीत भागीदार म्हणून काम करीत होता. त्याला या गैरकृत्याची पूर्णपणे माहिती होती, त्याला कंपनीतील सर्व कर्मचार्‍यांची माहिती होती, त्याच्याच आदेशावरुन कंपनीतील सर्व आर्थिक व्यवहार झाले होते, त्यातील काही हिस्सा त्याला मिळाला होता. त्यामुळे त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -