घरमनोरंजनRinku Rajguru : आरजित सिंहला प्रत्यक्षात पाहून भारावली रिंकू राजगुरू

Rinku Rajguru : आरजित सिंहला प्रत्यक्षात पाहून भारावली रिंकू राजगुरू

Subscribe

‘सैराट’चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरांत लोकप्रिय झाली. आजही प्रेक्षक तिला आर्ची या नावाने ओळखतात. चित्रपट प्रदर्शित होऊन वर्षे उलटून गेली तरी आजही रिंकूची क्रेझ कायम आहे. रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने पहिल्यांदा लाइव्ह कॉन्सर्टचा अनुभव घेतला. सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या पुण्यातील कॉन्सर्टला रिंकू गेली होती. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करत रिंकूने असं कॅप्शन लिहिले आहे की, “जेव्हा तुमच्या मनातली गोष्ट सांगायला शब्द सापडत नाहीत. तेव्हा संगीत तुमच्या मनातील गोष्ट सांगतं. माझा हा पहिलाच कॉन्सर्ट होता, ज्याचा अनुभव खूपच भारी होता,” रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अरिजीत सिंहच्या लाइव्ह कॉन्सर्टमधला व्हिडीओ शेअर केला आहे.

- Advertisement -

 या व्हिडीओत, स्टेजवर आरजित गाताना दिसत आहे. तर त्याला गाताना पाहून रिंकूचा आनंद गगनात मावेनासा झाला. आरजितला स्टेजवर लाइव्ह गाताना पाहून रिंकू उड्या मारत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच आरजित सिंहच्या कॉन्सर्टला हजेरी लावल्याचं रिंकूने पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. तिच्याबरोबर व्हिडिओत अभिनेत्री गौरी इंगावलेही दिसत आहे. रिंकूच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

दरम्यान, रिंकू राजगुरुच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘झिम्मा 2’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने तानिया ही भूमिका साकारली आहे. याशिवाय आजवर तिने ‘सैराट’, ‘कागर’, ‘मेकअप’,‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘झुंड’असा बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर ती काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावेसह एका चित्रपटाचं चित्रीकरण करताना दिसली होती. यावेळी रिंकू व सुबोधसह अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील होती. त्यामुळे या त्रिकुटचा कोणता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे? याची उत्सुकता रिंकूच्या चाहत्यांना लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -