घरट्रेंडिंगWho is Shrinivas Pawar : वडिलधाऱ्यांचा आदर न करणारे नालायक म्हणणारे श्रीनिवास...

Who is Shrinivas Pawar : वडिलधाऱ्यांचा आदर न करणारे नालायक म्हणणारे श्रीनिवास पवार आहेत तरी कोण?

Subscribe

मुंबई – अजित पवारांनी बारामतीतच काका शरद पवार आणि चुलत बहीण सुप्रिया सुळेंविरोधात मोर्चा उघडला आहे. यानंतर अजित पवार यांचा सर्वाधिक विश्वास असलेले त्यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांची साथ सोडली आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सुरुवात करताना अजित पवार बारामतीमधील एका सभेत म्हणाले होते की संपूर्ण पवार कुटुंब माझ्याविरोधात उभे राहाणार आहे. त्यांचे ते शब्द आता खरे होताना दिसत आहेत. श्रीनिवास पवारांनी अजितदादांसोबतच्या नात्याची एक्सपायरी डेट संपल्याचे बारामतीमध्येच जाहीर करुन टाकले.

शरयु उद्योग समुहाचे संचालक श्रीनिवास पवार
शरयु उद्योग समुहाचे संचालक श्रीनिवास पवार

कसे होते दोन्ही भावांमधील नाते?
अजित पवारांनी राजकारणाचे धडे काका शरद पवारांकडे गिरवले आहेत. तर आयुष्यातील प्रत्येक चढउतारांवर त्यांना त्यांचे बंधू श्रीनिवास पवारांनी साथ दिली आहे.
अजित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेचा शपथ विधी घेतला होता. त्यानंतर काही तासांसाठी ते गायब झाले असं म्हटलं जात होतं, तेव्हा ते श्रीनिवास पवार यांच्या घरी होते असं समजलं होतं.
राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट घेऊन जेव्हा ते पुन्हा भाजपला जाऊन मिळाले आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतरही ते श्रीनिवास पवार यांना भेटायला गेले होते.

- Advertisement -

या दोन्ही प्रसंगातून दोन्ही भावांमधील नातेसंबंध किती गहिरे होते, हे स्पष्ट होते.

अजित पवार वेळोवेळी त्यांचा सल्ला घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या आयुष्यात श्रीनिवास पवारांचे महत्व किती हे लक्षात येते.

- Advertisement -
श्रीनिवास पवार आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिले मात्र याआधी ते फक्त कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हजर असायचे.
श्रीनिवास पवार आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिले मात्र याआधी ते फक्त कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हजर असायचे.

कोण आहेत श्रीनिवास पवार?

श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांनी उद्योग उभे केले आहेत. राजकारणाशी त्यांचा प्रत्यक्ष कधीही संबंध राहिला नाही. पण प्रत्येक महत्वाचा निर्णय अजित पवार त्यांच्या सल्ल्याने घेतात असं सांगितलं जातं.

श्रीनिवास पवार आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिले. पण आता ते बारामतीमध्ये सक्रीय झाल्याचे दिसत आहे. याआधी ते फक्त कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हजर असायचे. त्यांचा शरयू उद्योग समूह आहे. यात कृषी, ऑटोमोबाईल, रियल इस्टेट, ऑटोमोबाईल डिलरशीप आणि सिक्युरीटी सर्व्हिसेससारखे उद्योग आहेत.

त्यांनी आपला व्यवसाय ऑटोमोबाइल डीलर म्हणून सुरू केला. यानंतर त्यांनी त्यांच्या उद्योग समुहाचा विकास मोठ्या प्रमाणात केला. त्यांची शरयु ऑटोमोबाईल्सने भारतातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोबाईल डीलर्सपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. शरयु शुगर इंडस्ट्रिज हा साखर कारखानाही ते चालवतात. मुलगा युगेंद्र पवार आता कारखान्याचे संचालक आहेत.

शरद पवार यांच्या कुटुंबातील दोन स्नुषा शर्मिला पवार, सुनेत्रा पवार आणि कन्या सुप्रिया सुळे
शरद पवार यांच्या कुटुंबातील दोन स्नुषा शर्मिला पवार, सुनेत्रा पवार आणि कन्या सुप्रिया सुळे

शरद पवार राजकारणात पुढे पुढे जात असताना अजित पवार त्यांच्याकडे रहायला गेले. काकांच्या सांगण्यावरून त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. अजित पवार हे शरद पवारांचा उजवा हात म्हणून ओळखला जात होते. मात्र 2 जुलै 2023 रोजी त्यांनी शरद पवारांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही ताबा मिळवला. आता बारामतीमध्ये ते काका आणि बहिणीच्या विरोधातच उभे राहिले आहेत. हे चित्र पाहून श्रीनिवास पवार त्यांची पत्नी शर्मिला पवार आणि मुलगा युगेंद्र हे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसाठी सख्ख्या भावाविरोधात मैदानात उतरले आहेत.

हेही वाचा : Pawar Vs Pawar : सख्खा भाऊच अजितदादांच्या विरोधात; श्रीनिवास म्हणाले, तुमच्यासारखा नालायक कोणी नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -