घरमनोरंजनDance Deewane च्या मंचावर रोहित शेट्टीला कोसळले रडू

Dance Deewane च्या मंचावर रोहित शेट्टीला कोसळले रडू

Subscribe

अनेक दिग्गज दिग्दर्शकांच्या यादित रोहित शेट्टीचे नाव घेतले जाते.

डांन्स रिअॅलिटी शो ‘डांन्स दिवाने 3’ (Danve Deewane 3) चा आगामी भाग खूप खास असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपट निर्माते आणि रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’ चे होस्ट रोहित शेट्टी(Rohit shetty) ‘डांन्स दिवाने 3’ मध्ये दिसणार आहेत. रोहित शेट्टीसह ‘खतरों के खिलाडी 11’ चे काही स्पर्धकही या शोमध्ये दिसतील. असे सांगितले जात आहे की ‘डांन्स दीवाने 3’ दरम्यान रोहित शेट्टी अत्यंत भावूक झाला असून त्याच्या डोळ्यात अश्रू तरंगू लागले.(rohit shetty gets emotional on dance deewane set)

दरम्यान, रोहित शेट्टी डांन्स दिवाने मध्ये हजेर लावणार आहे हे कळताच शोमध्ये आगामी एपिसोड्स स्टंट बेस्ड थीमवर सर्व  डांस करणार असल्याचे कळतेय. यावेळी एका स्पर्धकाने केलेला स्टंट पॅक धमाकेदार डांन्स परफॉर्मन्स पाहून रोहित शेट्टीला त्याच्या वडिलांची आठवण आली. यावेळी त्यांनी वडिलांच्या काही आठवणी शेअर केल्या रोहीत शेट्टी म्हणाला, आजही असे मानले जाते की एका स्टंट मॅनला इंडस्ट्रीमध्ये काहीच मान नाही मिळत. स्टंट मॅनची इंडस्ट्रीमध्ये काय किंमत असते हे मला चांगलेच ठाऊक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

रोहीत शेट्टीचे वडील देखील बॉलिवूडमधील एक नावाजलेले लोकप्रिय स्टंटमॅन होते. मात्र त्यांचा बॉलिवूडमधील प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता. इंडस्ट्रीमध्ये त्यांना काम मिळणे फारच कठीण होते. त्यांना प्रचंड स्ट्रगल करावा लागला होता. मात्र वडिलांप्रमाणेच आज रोहितने देखील प्रचंड मेहनत करुन इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. आज अनेक दिग्गज दिग्दर्शकांच्या यादित रोहित शेट्टीचे नाव घेतले जाते. तसेच रोहितचा प्रत्येक सिनेमा कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवतो.

- Advertisement -

हे हि वाचा – Siima Award 2021 रश्मिकाला मिळाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा अवॉर्ड तर महेश बाबू ठरला सर्वोत्कृष्ठ अभिनेता

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -