घरताज्या घडामोडीमोदींचा ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा गुण आवडतो, प्रीतम मुंडेंच...

मोदींचा ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा गुण आवडतो, प्रीतम मुंडेंच वक्तव्य

Subscribe

मोदींनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येते. पण मोदी टीकांमुळे विचलित होत नाहीत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ७ वर्षांच्या कालमर्यादेमध्ये एकाही पत्रकार परिषद घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाच गुण आपल्याला आवडत असल्याचे खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. परंतु आपल्याला तो गुण आवडत असल्याचे विधान भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलं आहे. तसेच बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रावीदा काँग्रेसच्या भ्रष्टाचारातून मुक्त करायचा असल्याचे आवाहन भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांनी केलं आहे. टीकाकारांच्या टीकेवरुन आपलं लक्ष विचलित न होता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलं काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनामित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी संवाद साधताना प्रीतम मुंडेंनी बीड जिल्हा भ्रष्टाचार आणि राष्ट्रवादीमुक्त करायचा असल्याचे म्हटलं आहे. तसेच आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ७ वर्षांच्या काळात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पंतप्रधान मोदींचा आपल्याला हाच गुण अधिक आवडतो असे प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. परंतु मोदींनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येते. पण मोदी टीकांमुळे विचलित होत नाहीत, ते आपलं काम करत राहतात यामुळे त्यांचा हा गुण आपल्याला आवडतो असे प्रीतम मुंडे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीवर घणाघात

खासदार प्रीतम मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादी मुक्त करण्याचा निर्धार केल असल्याचे प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचार आणि राष्ट्रवादीपासून मुक्त करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी झटून काम केल पाहिजे. राष्ट्रवादीकडून कंत्राटदारांना हाताशी धरून आपण काम केलं असल्याचे सांगितले जात आहे. ज्या रस्त्यांच्या कामाशी आपला संबंध नाही त्याचेही श्रेय राष्ट्रवादीचे नेते घेत आहेत असा आरोप प्रीतम मुंडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : अजित पवार नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री की पिंपरी चिंचवडचे, चंद्रकांत पाटलांचा टोला

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -