घरमनोरंजनरॉमकॉममध्ये अनुभवा मराठवाड्याची संस्कृती!

रॉमकॉममध्ये अनुभवा मराठवाड्याची संस्कृती!

Subscribe

मराठवाड्याचे सौंदर्य, लेण्या, मंदिर, संस्कृती, भाषा याची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. मराठवाड्यावर आधारीत रॉमकॉम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रत्येक राज्याला स्वत:चा असा एक इतिहास असतो. त्याचप्रमाणे ‘मराठवाडा’ला देखील ऐतिहासिक ठेवा लाभला आहे. मराठवाड्याचे सौंदर्य, लेण्या, मंदिर, संस्कृती, भाषा याची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. मराठवाड्याताल जनजीवनावर आधारीत ‘रॉमकॉम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

औरंगाबादपासून जवळ असलेल्या वैजापूर शहरात रॉमकॉमची कथा घडते. रॉमकॉममधून मधुरा वैद्य आणि विजय गीते ही फ्रेश जोडी दिसणार आहे. याशिवाय किशोर कदम, असीत रेड्डी, छाया कदम हे दिग्गज कलावंत या चित्रपटात आहे.

- Advertisement -

हा चित्रपट त्याच्या वेगळ्या लोकेशनमुळे सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचे कथानक हे याच भागातले असल्यामुळे त्यांची बोलीभाषा व इतर सर्व गोष्टी या मराठवाड्यातील वैजापूरशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यामुळे संपूर्ण चित्रपट मराठवाड्यात चित्रीत झाला आहे. ‘रॉमकॉम’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल.

नेहमीपेक्षा वेगळ्या भागात घडणाऱ्या या चित्रपटाबद्दल कलाकारही उत्सुक असून त्यांच्याही आजवरच्या भूमिकांपेक्षा हटके भूमिका चित्रपटात आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल याची खात्री मला आहे.

आसीत रेडीज, अभिनेता

प्रेमकथा, अॅक्शन आणि विनोद यांचा संगम असलेला प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट म्हणून रॉमकॉम ओळखला जाईल असा ठाम विश्वास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्हाला मराठवाड्याचे दर्शन होणार आहे. हा चित्रपट पूर्ण होण्यामागे मराठवाड्यातील लोकांचा मोठा हातभार आहे.

मधुरा, वैद्य, अभनेत्री

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -