घरट्रेंडिंगहे नवीन आहे; बाजारात आलाय 'तैमुर' बाहुला

हे नवीन आहे; बाजारात आलाय ‘तैमुर’ बाहुला

Subscribe

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर अली खान याची प्रसिध्दी आता पुढच्या स्तरावर गेली आहे. मीम्स नंतर आता बाजारात तैमुर बाहुला आला आहे.

सोशल मीडियावर कायम पॉप्युलर आणि सर्वात अधिक चर्चेत असलेला स्टार किड म्हणजे तैमुर अली खान. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा तैमुर सोशल मीडियावर नेहमीच ट्रेडिंगमध्ये असतो. आता मात्र नेटीझन्सचा लाडका तैमुर तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता! काय आश्चर्यचकित झालात ना? हो, हे खरं आहे. केरळच्या एका खेळण्याच्या दुकानामध्ये ‘तैमुर बाहुला’ विक्रीसाठी ठेवला गेलाय. चित्रपट निर्मात्या अश्विनी यार्दी यांनी ट्विटरवर तैमुर डॉलचा फोटो शेअर केला असून या फोटोमुळे नेटिझन्स तैमुर आणि त्याच्या बाहुल्यातील साम्य पाहून चकित झाले आहेत.

तैमूरच्या खेळणीची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. फोटोमध्ये बाहुल्याने पांढरा कुर्ता, नेव्ही ब्लू नेहरु जॅकेट आणि निळी पँट घातलेली दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याआधी एका कार्यक्रमात तैमुरने या बाहुल्या सारखेच कपडे घातले होते.

- Advertisement -

काय म्हणाले सैफीना

या गोष्टीवर सैफ आणि करीना यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. सैफ म्हणाला की, संबंधित उत्पादकाने तैमुरच्या नावाचे ट्रेडमार्क बनवायला हवा. आम्ही फक्त हे करू शकतो की तैमुरला आम्ही एक बाहुला भेट म्हणून देऊ शकतो. सैफ आनंदीत आहे की लोकांना त्याच्या मुलामुळे फायदा होतोय आणि सैफने देवाकडे तैमुरच्या ‘सलामतीसाठी दुआ’ मागितली आहे.

दुसरीकडे करीना म्हणते की, तैमुर त्याच्या लोकप्रियतेपासून दूर पळू शकत नाही आणि आम्हीसुद्धा. तिने तैमुर डॉल पाहिली तेव्हा तिला काय बोलावे हे सुचतच नव्हते. पण सैफ बोलला की, लोक त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि हा त्याच्यांसाठी एक आशीर्वाद आहे. करीना म्हणाली की, लोक तैमुरवर मनापासून प्रेम करतात. त्यामुळे आम्ही त्यांना त्याचे फोटोज काढण्यापासून किंवा बाहुली बनवण्यापासून थांबवू शकत नाही. पण त्यांना हे कळले पाहिजे की तो फक्त दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याने ही सामान्यांसारखे आयुष्य जगायला हवे. सैफ आणि आणि मी तैमुरला एक सर्वसाधारण आयुष्य देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. प्रसारमाध्यमांना माघार न घ्यायला लावता आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो, असेही ती म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -