घरमनोरंजनअभिनेता अक्षय कुमारची एसआयटीकडून दोन तास चौकशी

अभिनेता अक्षय कुमारची एसआयटीकडून दोन तास चौकशी

Subscribe

अभिनेता अक्षय कुमारला संकटाचा सामना करावा लागला आहे. शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाब एसआयटीने अभिनेता अक्षय कुमार याची तब्बल दोन तास कसून चौकशी केली आहे.

अभिनेता अक्षय कुमारला संकटाचा सामना करावा लागला आहे. शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाब एसआयटीने अभिनेता अक्षय कुमार याची आज, २१ नोव्हेंबर रोजी तब्बल दोन तास कसून चौकशी केली आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी अक्षयला ४२ प्रश्न विचारले. मात्र अक्षयनं पोलिसांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा आरोप

‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा रामरहीम सिंग याचा ‘मेसेंजर ऑफ गॉड’ नावाचा एक चित्रपट सप्टेंबर २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात राम रहीमची निर्दोष सुटका करण्यात आली होती. मात्र, पंजाबमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. तो विरोध डावलून चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय रामरहीम आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या बैठकीत झाला होता. ही बैठक अक्षय कुमारच्या घरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे अक्षयकुमार अडचणीत सापडला होता. धर्मग्रंथाचा अवमान केल्याप्रकरणी अक्षय कुमार, रामरहीम आणि सुखबीर सिंग बादल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

अक्षयला केले रामरहीमच्या भेटीबाबत प्रश्न

याच प्रकरणात सुखबीर सिंग बादल आणि अक्षय कुमारला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार आज अक्षय एसआयटीसमोर हजर झाला. अधिकाऱ्यांनी अक्षयला रामरहीमच्या भेटीबद्दल अनेक प्रश्न विचारले. रामरहीमची ओळख कशी झाली? कुठे झाली? असे प्रश्न त्याला विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, रामरहीमला आपण कधीही भेटलो नाही, असे अक्षयने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -