घरमनोरंजन'सैराट' सिनेमाला ७ वर्ष पूर्ण झाल्याने रिंकूने शेअर केली खास पोस्ट

‘सैराट’ सिनेमाला ७ वर्ष पूर्ण झाल्याने रिंकूने शेअर केली खास पोस्ट

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक गाजलेला सिनेमा ‘सैराट’ ला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही सिनेमा आजही आवर्जुन पाहिला जातोच. पण त्यामधली गाणी ऐवढी गाजली की, विदेशातील लोकांना ही त्याची भुरळ पडली. याच निमित्त सैराट फेम रिंकूने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

रिंकूने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने, सैराटला सात वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच हा प्रवास न विसरण्यासारखा होता असे ही म्हटले आहे.

- Advertisement -

सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने असे म्हटले आहे की, नागराज मंजुळे यांनी त्यांचे खरे कौशल्य यामधून दाखवले आहे. तसेच एकदी साध्या सरळ स्क्रिप्ट खरंच उत्तम आहे. अशी कमेंट करणारा युजर खरंतर मराठी नाही, त्याला ही भाषा कळत ही नाही. पण तरीही त्याने सिनेमासह त्या मधील सर्वांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

- Advertisement -

२०१६ रोजी २९ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने त्याने रेकॉर्ड ब्रेक कमाई ही केली होती. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या नवोदित कलारांना यामध्ये संधी मिळाल्यानंतर ते आता स्टार झाले आहेत.


हेही वाचा- Video: किली पॉलच्या बहिणीची ‘बहरला हा मुधमास’ गाण्यावरील रिल्स पाहिलीत का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -