घरताज्या घडामोडी९९ टक्के तरूण १ टक्का जॉबच्या पाठीमागे का, काय आहे Plan B?...

९९ टक्के तरूण १ टक्का जॉबच्या पाठीमागे का, काय आहे Plan B? राहुल गांधींचा मुखर्जीनगरच्या Aspirantsला सवाल

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मुखर्जीनगरच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशीही चर्चा केली. मुखर्जीनगर हा उत्तर दिल्लीतील एक परिसर आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावावरून ते नाव देण्यात आलं आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या परिसरात राहतात.

९९ टक्के तरूण १ टक्के जॉबच्या पाठी का आहेत?, असा सवाल राहुल गांधी यांनी मुखर्जीनगरच्या Aspirantsला विचारला होता. त्यावेळी येथील काही विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करत भावना व्यक्त केल्या. १० लाख लोकांकडून यूपीएसएसीसाठी अर्ज भरला जातो. मात्र, १७३ लोकांचीच भरती केली जाते. आम्हाला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नाहीये, असं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं.

- Advertisement -

तुम्ही भविष्यात काय करु इच्छिता?, असा प्रश्न जेव्हा मी तरुणांना विचारला असता ९९ टक्के तरुणांकडून मला फक्त ५च उत्तरं मिळायची. वकील, डॉक्टर, आयपीएस, आयएएस आणि इंजीनिअर किंवा पोलीस आणि भारतीय सैनिक अशा प्रकारची उत्तरं मला विद्यार्थ्यांकडून मिळायची. फक्त एकच मुलगी अशी होती. ज्या मुलीला एखादा व्यापार सुरू करायचा होता. त्यामुळे मला असं वाटलं की, मी तुमची भेट घेऊन तुमच्याशी चर्चा करू, असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी १८ एप्रिल रोजी अचानक दिल्लीच्या रस्त्यांवर फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांनी बंगाली मार्केटमध्ये पानीपूरीचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर त्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

राहुल गांधी यांची सत्र न्यायालयाने दोषित्व स्थगित करण्यास नकार दिला होता. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्दच राहिली. सुरतच्या महान्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सेशन कोर्टाने नकार दिला. त्यामुळे राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात हायकोर्टात धाव घेतली. त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत पी.राहुल गांधी यांच्या अपीलावर सुनावणी करणार आहेत.


हेही वाचा : Rahul Gandhi Defamation Case: मानहानी प्रकरणात राहुल गांधीच्या अपिलावर गुजरात उच्च न्यायालयात उद्या सुनावणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -