घरमनोरंजनसलमान सोबत पुन्हा एकदा झळकणार कतरिना

सलमान सोबत पुन्हा एकदा झळकणार कतरिना

Subscribe

टायगर सिरीजच्या आगामी चित्रपटाकरिता कतरिना कैफ या अभिनेत्रीचे नाव फायनल झाले आहे. बॉलिवूडमधील सौदी फिल्म फेस्टीवलमध्ये खुद्द सलमानने याबाबत सांगितले.

बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ या दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहे. २००५ साली ‘मैंने प्यार क्यों किया’ या चित्रपटातून पहिल्यांदा दोघांनी काम केले होते. यानंतर २००८ साली दोघांनी युवराज चित्रपटात काम केले होते. २०१२ मध्ये दोघे ‘एक था टाइगर’ तर, २०१७ मध्ये याचा सीक्वील ‘टाइगर जिंदा हैं ‘ या चित्रपटातून दोघे दिसले होते. याशिवाय लवकरच सलमान-कतरिना दोघेही भारत या चित्रपटात दिसणार आहे.

- Advertisement -

टायगर सिरीजमधून पुन्हा एकत्र

सलमान-कतरिनाच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी आहे. सलमान सोबत पुन्हा एकदा कतरिना झळकणार असल्याची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये बघायला मिळते. टायगर सिरीजच्या आगामी चित्रपटाकरिता कतरिना कैफ या अभिनेत्रीचे नाव फायनल झाले आहे. बॉलिवूडमधील सौदी फिल्म फेस्टीवलमध्ये खुद्द सलमानने याबाबत सांगितले. यासोबतच, टायगर सिरीजच्या तिसऱ्या चित्रपटात पुन्हा दोघे एकत्र झळकताना दिसणार आहे.

- Advertisement -

दोन करोडची लग्झरी कार दिली भेट

सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांसोबत प्रेक्षकांनी टायगर सिरीजच्या मागील दोन्ही चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद दिला. यासह दोन्ही चित्रपटातील अॅक्शन सीन प्रेक्षकांना चांगलेच भावले. सलमान आणि कतरिना मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना तसेच त्यांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडत असल्याने सलमान -कतरिनाचा कोणताही चित्रपट असो तो सुपरहिटच ठरतो. सलमान आणि कतरिनाचं वेगळच नातं असल्याने मोठ्या पडद्यावरही ते दिसून येते. सलमानने कतरिनाला २ करोडची लग्झरी कार रेंज रोवर भेट म्हणून सुफूर्त केली होती.

Ode to My Father  चित्रपटचा हिंदी रिमेक

सलमान आणि कतरिनाच्या भारत चित्रपटाचा ट्रेलर एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. भारत हा चित्रपट कोरियन चित्रपट Ode to My Father या चित्रपटचा हिंदी भाषेतील रिमेक आहे. या चित्रपटात सलमान- कतरिना दिसणार असून, याशिवाय अभिनेत्री दिशा पाटनी, जॉकी श्रॉफ, तब्बू, सुनीन ग्रोवर देखील असणार आहे. यासोबत सलमानच्या दंबग चित्रपट सिरीजच्या आगामी चित्रपटाची शुटिंग सुरू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -