घरमनोरंजनSamantha :समंथाने घटस्फोटानंतर उकळले 50 कोटी रुपये ?

Samantha :समंथाने घटस्फोटानंतर उकळले 50 कोटी रुपये ?

Subscribe

दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये (Bollywood)देखील आपली पकड घट्ट करणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha prabhu) सध्या तिच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. समंथाने 2 ऑक्टोबर रोजी नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेत असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. मात्र यानंतर समंथाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोर जावं लागलं अनेकांनी तिच्यावर गर्भपातासारखे गंभीर आरोप देखील केले मात्र वेळोवेळी समंथाने ट्रोलिंगला न जुमानता सडेतोड उत्तर दिले. पुन्हा एकदा समंथाने याबाबत एक पोस्ट शेअर करत तिच्यावर टिका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.

समंथाने तिच्या सोशल मीडिया अकांऊटवरून तिच्या सासरकडचे अडनाव हटवल्यानंतर चाहत्यांच्या मनात संशय निर्माण झाला होता. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी नागा आणि समंथाने पुढाकार घेत विभक्त होत असल्यांच जाहीर केलं होतं. तसेच हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला असल्याचं देखील ती म्हणाली होती. मात्र चाहते त्यांच्या दुराव्यामुळे प्रचंड नाराज झाले आणि काहींनी तर या घटस्फोटासाठी समंथा जबाबदार आहे असं देखील म्हंटल होतं. समंथा आणि नागा यांना विभक्त होऊन आता 2 महिने झाले असले तरी चाहते हे मान्य करायला तयार नाहीत पुन्हा एकदा एका यूजरने समंथावर टीका केली आहे. “घटस्फोटीत समंथाने एका चांगल्या व्यक्तीकडून करमुक्त 50 कोटी रुपये उकळले” असं ट्विट केलं आहे. त्यावर समंथाने देखील प्रतिक्रिया देत “देव तुमच्या आत्म्याला शांती देवो” असं लिहलं आहे.

- Advertisement -

 


घटस्फोट झाल्यानंतर समंथाला मोठ्या प्रमाणत टार्गेट करण्यात आलं मात्र नागा चैतन्यला या परिस्थितीचा जास्त सामना करावा लागला नाही. एका स्त्रीवरच हे सर्व आरोप लावले जातात असं वक्तव्य सामंथा हीने एका मुलाखती दरम्यान केलं होत.

- Advertisement -

 


हे हि वाचा – Indian Idol12 फेम सायली कांबळेने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -