घरताज्या घडामोडीSheena Bora Murder Case: काश्मीरमध्ये शीना बोराची एका महिलेसोबत भेट, CBI...

Sheena Bora Murder Case: काश्मीरमध्ये शीना बोराची एका महिलेसोबत भेट, CBI समोर ती महिला देणार जबाब

Subscribe

इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांनी केलेल्या या नव्या खुलास्यानंतर हे प्रकरण नवे वळण घेण्याची शक्यता

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने काही दिवसांपूर्वी  शीना बोरा जिवंत असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. शीना जिवंत असून ती सध्या काश्मीरमध्ये आहे. शीना जिवंत आहे हे सांगण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने CBI ला एक चिठ्ठी पाठवत शीनाचा काश्मीरमध्ये शोध घेण्याची विनंती केली होती. आता त्यानंतर इंद्राणी मुखर्जी यांच्या वकील सना आर खान यांनी शीना बोरा प्रकरणात आणखी एक खुलासा केला आहे. शीना बोरा काश्मीरमध्ये एका महिला अधिकाऱ्याला भेटली. शीनाला भेटणारी ती महिला CBI समोर जबाब देण्यासाठी तयार असल्याचे वकीलांनी सांगितले आहे.

शीना बोरा प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांची वकील जेव्हा त्यांना भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा त्यांनी वकील सना यांना ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, २४ जूनला एक महिला अधिकारी शीनाला काश्मीरच्या दाललेक जवळ भेटली. शीनाला भेटलेली ती महिला CBI समोर जबाब देण्यासाठी तयार आहे. शीना बोरा काश्मीरमध्ये असून तिचा शोध घेण्यासाठी मी CBI कडे अर्ज दाखल करणार असल्याचे वकीलांनी सांगितले. इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांनी केलेल्या या नव्या खुलास्यानंतर हे प्रकरण नवे वळण घेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -


२०१५पासून शीना बोरा हत्याकांडात मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जी मुंबईतील भायखळाच्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. इंद्राणी मुखर्जींची जामीन याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता इंद्राणी मुखर्जी जामीनासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे.

एप्रिल २०२१मध्ये २४ वर्षीय शीना बोराची नवी मुंबईजवळच्या जंगलात गळा दाबून हत्या करण्यात आली. शीनाचा मृतदेह रायगड जिल्ह्यात सापडला होता. २०१५मध्ये या प्रकरणाचा खुलासा करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी आणि तिचा ड्रायव्हर श्यामवर राय तसेच इंद्राणी यांचा पहिली पती संजीव खन्ना यांना अटक केली. त्यानंतर इंद्राणी यांचा दुसरा पती पीटर याला देखील या प्रकरणात अटक करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Sheena Bora Murder Case: ‘शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये शोधा’; इंद्राणी मुखर्जीचे CBIला पत्र, काय आहे शीना बोरा हत्याकांड?  

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -