घरताज्या घडामोडीCall Details : सुशांतचा जवळचा मित्र संदीप सप्टेंबरपासून संपर्कातच नव्हता कारण

Call Details : सुशांतचा जवळचा मित्र संदीप सप्टेंबरपासून संपर्कातच नव्हता कारण

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनापासून त्याचा मित्र संदीप सिंह सतत चर्चेत असतो. संदीप सिंह स्वत: ला सुशांतचा चांगला, जवळचा मित्र मानतो. पण सुशांतच्या या जवळच्या मित्राबद्दल सुशांतच्या कुटुंबियांना माहितीच नव्हती. आता संदीप सिंगच्या कॉल डिटेल्स समोर आल्या आहेत. त्या अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

संदीप सिंगचा कॉल डिटेल्स टाइम्स नाऊने दिले आहेत. यानुसार स्वत: ला सुशांतचा चांगला मित्र म्हणणारा संदीप सिंग गेल्या १० महिन्यांपासून सुशांतच्या संपर्कात नव्हता. संदीप आणि सुशांत यांच्यात शेवटचं बोलणं १ सप्टेंबर २०१९मध्ये झालं होतं. पण सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप सिंह अचानक पुन्हा चर्चेत आला. कारण सुशांतच्या मृत्यूनंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला तेव्हा संदीपचबरोबर होता. पण जर संदीप सुशांतचा एवढा जवळचा मित्र होता तर तो १० महिने सुशांतच्या संपर्कात का नव्हता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

संजय निरूपम यांच्या संपर्कात होता संदीप

संदीप सिंगच्या कॉल डिटेलवरून हे स्पष्ट झाले की गेल्या १० महिन्यांपासून तो सुशांतच्या संपर्कात नव्हता. पण संदीप कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. संदीपच्या कॉल डिटेलवरून सुशांतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चालक अक्षय बंडगर याच्याशीही संपर्क असल्याचे समोर आले आहे. संदीपने १४ जून रोजी अक्षयला पहिला फोन केला होता. ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला होता, तर त्याचा पुढचा फोन १६  जून रोजी सुशांतच्या मृत्यूच्या २ दिवसानंतर केला होता. आता प्रश्न असा आहे की सुशांतच्या अंत्यसंस्कारानंतरही संदीप सिंगने 16 जूनला रुग्णवाहिका चालकाला का फोन केला होता?


हे ही वाचा – Sushant Sucide Case: CBI ची लिस्ट तयार, रियाला विचारणार ‘हे’ २४ प्रश्न!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -