घरमनोरंजनसंजय दत्तची मराठीमध्ये एंट्री

संजय दत्तची मराठीमध्ये एंट्री

Subscribe

बॉलीवूडमधील बऱ्याच कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टीने भुरळ घातली आणि आता यामध्ये अजून एका नावाची भर पडली आहे. संजय दत्तही आता मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

मराठी चित्रपटाला सध्या सुगीचे दिवस आले आहेत असं सगळीकडे म्हटलं जात आहे. मराठी चित्रपटाचं रूप पालटलं आहे. शिवाय वेगवेगळे विषय हाताळले जात आहे. तसेच मराठी चित्रपटांमध्ये वास्तववादी चित्रण जास्त करण्यात येतं. त्यामुळे बॉलीवूडमधील बरेच कलाकार मराठी चित्रपटांकडे आकर्षित होताना दिसत आहेत. यामध्ये सलमान खान, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम अशा नावांची यादीच होईल. आता यामध्ये अजून एका बड्या नावाची भर पडली आहे. हे नाव दुसरं तिसरं कोणाचं नसून बॉलीवूडचा बाबा अर्थात संजय दत्तचे आहे.

संजय दत्त करतोय मराठी चित्रपटाची निर्मिती

संजय दत्त आपल्या निर्मिती संस्थेद्वारे लवकरच मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं त्यानं स्वतः ट्विट करून सांगितलं आहे. याआधी सलमान खान, आमिर खान, शाहरूख खान, अक्षय कुमार यासारख्या अभिनेत्यांनीही आपल्या स्वतःच्या निर्मिती संस्थेद्वारे चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता यामध्ये संजय दत्तचीही भर पडली आहे. संजय दत्त आपला हा पहिलाच मराठी चित्रपट ब्लूमस्टँग प्रॉडक्शनसोबत करत असून या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिजीत खांडकेकर,दीपक ढोब्रियाल, स्पृहा जोशी, नंदिता धुरी असे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असली तरीही अजून या चित्रपटाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे संजय दत्तच्या या पहिल्या निर्मितीचं नक्की नाव काय याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये नक्कीच ताणली गेली आहे. तर, या चित्रपटामध्ये संजय दत्त स्वतः असणार की नाही? याबाबतही कोणतीही माहिती नाही.

- Advertisement -

हिंदी चित्रपटाचीही करणार निर्मिती

संजय दत्त मराठी व्यतिरिक्त सध्या २०१० मध्ये आलेल्या प्रस्थान या तेलुगू चित्रपटाच्या रिमेकचीदेखील हिंदीमध्ये निर्मिती करत आहे. यामध्ये स्वतः संजय दत्त मुख्य भूमिकेत असून मनिषा कोईरालादेखील दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -