घरमनोरंजन31 वर्षांपूर्वी शाहरूखला झाली होती तुरुंगवासाची शिक्षा

31 वर्षांपूर्वी शाहरूखला झाली होती तुरुंगवासाची शिक्षा

Subscribe

शाहरूख खान सध्या आपल्या करियरच्या उत्तम फेजमध्ये आहे. 2023 मध्ये त्याचा ‘पठान’, ‘जवान’ सिनेमा ब्लॉकस्टार ठरला. 30 वर्षांच्या करियरमध्ये शाहरूखने रोमान्स ते अॅक्शन मुव्ही केले आहेत. त्याचा जवान सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे.

शाहरूखच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल सर्वकाही माहिती आहे. पण फार कमी लोकांना माहितेय की, 31 वर्षांपूर्वी त्याला आपल्या वागण्यामुळे तुरुंगात जावे लागले होते. शाहरूखने हा किस्सा डेविड लेटरमॅनच्या ओटीटी चॅट शो मध्ये सांगितला होता. ही घटना 1992 मधील आहे. तेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये होता.

- Advertisement -

किंग खानने असे म्हटले की, एका पत्रकाराने माझ्याबद्दल एक लेख लिहिला होता. त्याला मी तो हटवण्यास सांगितला होता. पण त्याने नकार दिल्याने मला राग आला होता. त्यामुळे पत्रकाराच्या ऑफिसमध्ये पोहचत त्याला मारहाण केले होते. तेव्हा मी खुप मोठा हंगामा केला होता.

पत्रकाराने शाहरूखच्या विरोधात तक्रार केली होती. तेव्हा अभिनेत्याला वांद्रे पोलिसांनी तुरुंगात पाठवले होते. तेव्हा शाहरूखला आपण चुकलो असे वाटले. शाहरूखने त्यावेळी पोलिसांची माफी मागितली. पोलिसांनी सुद्धा त्याला त्याच्या चुकीबद्दल सांगितले आणि सोडून दिले.

- Advertisement -

दोन वर्षानंतर शाहरूखला कळले की, त्याने ते आर्टिकल एका दुसऱ्याच व्यक्तीने लिहिले होते. तेव्हा सुद्धा शाहरूखने पत्रकाराची माफी मागितली होती.


हेही वाचा- ‘आशिकी 2’ चे कलाकार पुन्हा एकत्र; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -