घरमहाराष्ट्रLok Sabha Election : लोकसभेसाठी भाजपची नवी खेळी, मोठ्या नेत्यांना देणार उमेदवारी?

Lok Sabha Election : लोकसभेसाठी भाजपची नवी खेळी, मोठ्या नेत्यांना देणार उमेदवारी?

Subscribe

देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप तरी जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. पंरतु अनेक राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसलेली असून आपापल्या पक्षांची मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.

मुंबई : देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप तरी जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. पंरतु अनेक राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसलेली असून आपापल्या पक्षांची मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. तर लोकसभा निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी देखील आपला जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात नवी खेळी खेळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Lok Sabha Election : Will BJP nominate big leaders for Lok Sabha?)

हेही वाचा – Bigg Boss फेम अभिनेत्रीला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण; काय आहे प्रकरण?

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात भाजपने ‘मिशन 45’साठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. राज्यातील 48 जागांपैकी 45 पेक्षा अधिक जागांवर भाजपला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यामुळे भाजपकडून राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांनाच लोकसभेसाठीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या व्यक्तीमध्ये लोकसभा जागा जिंकून आणण्याची क्षमता आहे, त्या व्यक्तीलाच उमेदवारी देण्यात येणार आहे, असा निकष भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपकडून चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, जळगावच्या रावेरमधून गिरीश महाजन, सोलापूरमधून राम सातपुते, ठाण्यातून संजय केळकर किंवा रविंद्र चव्हाण, आणि दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकरांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्र्यांची महाराष्ट्रातल्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींमध्ये देखील वाढ झाली असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असलेले आहेत.

- Advertisement -

तसेच, बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघात भाजप आपली ताकद लावणार आहे. यामध्ये 18 मतदारसंघात भाजप विशेष लक्ष देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर भाजपने 12 प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ असे हे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते लोकसभा मतदारसंघांवर लक्ष देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -