घरमनोरंजनजगभरातील 50 सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा समावेश

जगभरातील 50 सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा समावेश

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहेत. जवळपास 35 वर्षाच्या चित्रपट करिअरमध्ये शाहरुखने चाहत्यांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. याचाच प्रत्यय आता एका मॅगझिनमधून पाहायला मिळत आहे. जगभरात प्रसिद्ध असणारे एम्पायर या मॅगझीनमध्ये जगभरातील आत्तापर्यंतच्या 50 सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची यादी जाहिर करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारतातून केवळ शाहरुख खानला स्थान मिळालेलं आहे. या यादीत हॉलिवूडमधील टॉम हॅंक्स, मर्लिन मुनरो आणि केट विंसलेट यांच्या सहित अनेक कलाकारांचे नाव आहे.

शाहरुखच्या चित्रपटांचा उल्लेख

- Advertisement -

या मॅगझिनमध्ये शाहरुखच्या ‘देवदास’, ‘माय नेम इज खान’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘स्वदेस’ या चित्रपटांचे नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. याच्यासोबतच या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचा देखील उल्लेख करण्यात आला होता. यात देवदास मुखर्जी, रिजवान खान, राहुल खन्ना आणि मोहन भार्गव ही नावं आहेत.

‘पठाण’ चित्रपटामुळे शाहरुख चर्चेत

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे.

 


हेही वाचा :

‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ नंतर ‘झूमे जो पठाण’ गाण्यातील फोटो आले समोर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -