घरमहाराष्ट्रनागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यूच्या घटना लाजीरवाण्या; अजित पवारांकडून सरकारवर प्रश्नांचा भडिमार

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यूच्या घटना लाजीरवाण्या; अजित पवारांकडून सरकारवर प्रश्नांचा भडिमार

Subscribe

यवतमाळ जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील वैष्णवी बागेश्वर नावाच्या 17 वर्षीय तरुणीचा 15 सप्टेंबर 2022 रोजी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरून आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातीलआरोग्य व्यवस्थेवरून ताशेरे ओढत सरकारला अनेक सवाल केले आहेत. नागपूरमधील वैष्णवी बागेश्वर मृत्यूची घटना लाजीरवाणी बाब असल्याचं म्हणत दोन वर्षे कोरोना असतानाही आरोग्य विभागाला जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याचा निर्णय सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे आणि आम्ही घेतला होता. त्यामुळे आत्ताच्या शिंदे फडणवीस सरकारनेही शिक्षणाला प्राधान्य दिलेचं पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

अजित पवार यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य व्यवस्थेवरून सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. अजित पवार म्हणाले की, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एकूण बजेटमध्ये विदर्भासाठी एकूण किती निधी उपलब्ध केला आहे? नागपूर सार्वजनिक आरोग्य विभागात किती शासकीय रुग्णालये आहेत आणि तिथे किती बेडची उपलब्धता आहे? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नितीन राऊतांनी एक मागणी केली होती पीपीपी मॉडेलवर रुग्णालये करण्याचं मागे ठरलं होत मग सरकारनेही काही तरी ठरवलं, कुणी पुढे येणार नाही ते सरकारच्याच निधीतून करायचं पुढे त्यांनी ठरंवल. हरकत नाही पुढे एक चांगलं रुग्णालय होईल. नागपूर शहरापूर्ती असणारे सार्वजनिक रुग्णालये किती आहेत आणि त्यात बेड्सची उपलब्धता किती आहे? आणि त्या रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित डॉक्टरांची किती पदं मंजुर आहेत? आणि किती पदं रिक्त आहे? असे सवाल अजित पवारांनी आरोग्य मंत्र्यांना विचारले आहेत.

- Advertisement -

नवीन डॉक्टर भरती केव्हा करणार?

आरोग्य विभागात अडचण म्हणजे पदं मंजुर असतात परंतु जागा भरल्या जात नाही, त्यामुळे जागा रिक्त असल्याने त्याचा परिणाम रुग्णांवर होतो आणि बाकीच्या लोकांवर होतो. जिल्ह्यानुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. नवीन महाविद्यालय सुरु झाल्यास तिथे डॉक्टर पाठवले जातात. केंद्रीय पथकाच्या तपासणीतही नवीन डॉक्टर भरती केव्हा करणार? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

नवीन महाविद्यालयात जुन्या महाविद्यालयातील डॉक्टर पाठवण्याचा प्रकार केव्हा थांबणार? 

नवीन महाविद्यालयात जुन्या महाविद्यालयातील डॉक्टर पाठवण्याचा प्रकार केव्हा थांबणार? कारण एक मुलगी तिथे मृत्यूमुखी पडली आणि सातत्याने अशाप्रकारे घडत हे सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. त्याबाबत सरकारची काय भूमिका आहे असा सवालही अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे.

- Advertisement -

यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीही वैष्णवी बागेश्वर या मुलीचा मृत्यू नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे झाल्याची वस्तूस्थिती सभागृहात मांडली. तसेच रुग्णालयातील व्हेंटिलेटर दुरुस्त असते तर तिचे प्राण वाचले असते असंही त्यांनी नमूद केले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -